अखिल भारतीय जिवा सेना संघटनेच्या वतीने शिवरत्न जिवाजी महाले यांची जयंती उत्साहात साजरी

बातमी कट्टा: अ.भा.जिवाजी सेना संघटना शिरपुर, नाभिक हितवर्धक संस्था शिरपुर, नाभिक दुकानदार संघटना शिरपुर, व सकल नाभिक समाज बांधव यांच्या संयुक्त विद्यमाने शिरपुर शहरात शिवरत्न जिवाजी महाले यांची 386 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

शहरातील कुंभारटेक येथील बागुल नाना हॉस्टेल समोर चेतन शिरसाठ यांच्या एच-फ्रेंड्स मेन्स पॉर्लर याठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात आला. प्रतिमापूजन अ.भा.जिवा सेना संघटनेच्या तालुका अध्यक्षा रंजना सूर्यवंशी, भारती पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोरगावचे माजी सरपंच गोकूळ बोरगांवकर, जिवा सेनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष ओंकार ईशी, मुख्याध्यापक आर.बी.खोंडे, चेतन शिरसाठ, हेमंत सोनवणे, विजय महाले, सागर ठाकरे, दिनकर पवार, गणेश ईशी, प्रदिप ईशी, गोकुळ ईशी, जितेन्द्र सोनवणे, बबलु ईशी, किरण ईशी, सुनिल सुर्यवंशी, विकास सेन, रामचंद्र ईशी, शरद ईशी, भुपेश सोनगडे, नंदु वारुडे, योगेश वारुडे, विलास वारुडे, शुभम वारुडे, भद्रा वारुडे, पप्पु पवार, दादा निकम आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन मुख्याध्यापक आर.बी.खोंडे यांनी केले.

WhatsApp
Follow by Email
error: