अखेर “त्या” प्रकरणी गुन्हे दाखल…

बातमी कट्टा:- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यनंतर धुळ्यात शिवसैनिक आणि भाजपामध्ये आमनेसामने राडा झाला होता यानंतर पोलीस काय कारवाई करता याकडे सर्वांचे लक्ष लागले होते मात्र आता पोलीसांनी दोन्ही पक्षाच्या पदाधिकारींसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आमदराला धकाबुक्कीसह दगडफेक करत पोलीसाला दुखापतीत कारणीभूत असल्याप्रकरणी व विनापरवानगी प्रतिनिधीक अंत्ययात्रा काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासह व्हिडीओ वृत्तांत बघण्यासाठी चैनल सबस्क्राईब करा

काल दि 25 रोजी मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे धुळ्यात नारायण राणे यांच्या विरुध्द शिवसेनेचे परदेशी यांनी तक्रार दाखल केली होती.यादरम्यान शिवसैनिकांनी मंत्री नारायण राणे यांच्या प्रतित्माक पुतळ्याची अंतयात्रा काढली होती यावेळी भाजपचे अनुप अग्रवाल यांच्या कार्यालया जवळ शिवसेना व भाजपा मध्ये लाडा झाला होता.यादरम्यान दगडफेक शिवीगाळ करण्यात आली होती.पोलीसांनी लाठीचार्ज करत गर्दी वर नियंत्रण मिळवले होते.यानंतर पोलीसांनी याबाबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळींसह ईतरांवर विनापरवानगी प्रतिनिधीक अंत्ययात्रा काढून अमलदारास धक्कबुक्की केली व दगडफेकीत पोलीसाला दुखापत झाल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दुपारी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्यासह इतरांवर अंमलदाराला धक्कबुक्की,दगडफेकीत पोलीसाला दुखापत झाल्याचे कारणीभूत म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

WhatsApp
Follow by Email
error: