अजंदे खु.येथे पाणंद रस्त्याचे भुमिपुजन संपन्न

बातमी कट्टा:- शेतकऱ्यांसह ग्रामस्थांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या पाणंद रस्त्याचे अजंदे येथे भूमिपूजन करण्यात आले.यादरम्यान मोठ्यासंख्येने मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

शिरपूर तालुक्यातील अजंदे गावातील पाणंद रस्त्याचे नुकतेच भुमिपुजन संपन्न झाला.आमदार अमरिशभाई पटेल,आमदार काशिराम पावरा,भुपेशभाई पटेल,जि.प.उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, ताजपुरी लोकनियुक्त सरपंच राजेंद्र पाटील, उपसरपंच सुनिल वानखेडे यांच्या प्रयत्नांनी अजंदे खु शिवारात मातोश्री पाणंद रस्त्याचा मंजूर करण्यात आला.

त्या पाणंद रस्त्याचे भुमिपुजन अजंदे खु.येथे संपन्न झाले.यावेळी मान्यवरांसह गावातील शेतकरी बांधव,पोलीस पाटील विकास पाटील, मुकेश पाटील, विजय पाटील, अशोक पाटील, योगेश पाटील, गोपीचंद पाटील, अनिल पाटील, मनोहर दोरीक,पिंटू मराठे,गणेश पाटील, पंकज कोळी,राजेंद्र राठोड,राजेंद्र पाटील, निळकंठ पाटील, संजय माळी,भैया कोळी यासह संरपंच,उपसरपंच ,ग्रामपंचायत संदस्य,ग्रा.वि.अधिकारी,कर्मचारी आदी उपस्थित होते.

WhatsApp
Follow by Email
error: