बातमी कट्टा:- धुळे महापौर पदासाठी आज दि 17 रोजी विशेष महासभा संपन्न झाल्यानंतर धुळे महानगरपालिकेत भाजप पक्षाचे प्रदिप कर्पे यांना 73 पैकी 50 बहुमत मिळाल्याने महापौर पदी प्रदिप कर्पे यांची निवड झाल्यानंतर नगरसेवकांसोबत आमदार जयकुमार रावल यांनी गाण्यावर ठेका धरला त्याचा व्हिडीओ आता प्रचंड व्हायरल होत आहे.
धुळे महानगरपालिकेच्या महापौर पदी कोणाची निवड होते याकडे धुळेकरांचे लक्ष लागले होते भाजपकडे जरी स्पष्ट बहुमत होते तरी महाविकास आघाडी यात काही मास्टरमाइंड खेळी करु शकते अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.मात्र भाजपच्या 50 मतांच्या बहुमताने भाजपचे प्रदिप कर्पे यांची महापौर पदी निवड झाली.यानंतर शिंदखेडा आमदार जयकुमार रावल यांनी नगरसेवकांसमेवत गाण्यावर ठेका धरला.तो पत्ता करतो गुल पावरफुल या गाण्यावर नगरसेवकांसोबत आमदार जयकुमार रावलांनी ठेका धरल्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.