अन् नऊ एकरातील ऊस जळून खाक…

बातमी कट्टा:- मुख्य वीज वाहिनीच्या शॉर्ट सर्कीटमुळे सुमारे नऊ एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.दोन्ही शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत सुमारे 10 लाखांचा ऊस जळून खाक झाला आहे.

शिरपूर तालुक्यातील शिरपूर- करवंद रस्त्यावरील करवंद शिवारातील म्हाळसा पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या प्रा.बी.एन अहिरे व ज्ञानेन्वर भास्कर पाटील रा.करवंद या दोन्ही शेतकऱ्यांचा संपूर्ण नऊ एकरातील ऊस जळाला.दोन्ही शेतकऱ्यांचा ऊस तोडणीला आला होता.ऊस जळत असल्याची माहिती मिळताच दोघेही शेतकरी घटनास्थळी दाखल झाले होते.मात्र आगीने घेतलेल्या रौद्ररूप धारण केल्याने सर्वकाही हतबल झाले होते.अग्निशमनच्या दोन बंब घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणण्यात आली मात्र त्यावेळेत ऊस जळून खाक झाला होता.तोडणीला आलेला सुमारे 10 लाखांपेक्षा जास्त किंमतीचा ऊस मुख्य वाहिनीच्या विज तारांच्या शॉर्टशर्कीट मुळे जळाला असल्याचे सांगण्यात आले.बी.एन अहिरे यांचा तीन एकर तर ज्ञानेश्वर पाटील यांचा नऊ एकर क्षेत्रातील ऊस जळाला आहे.

WhatsApp
Follow by Email
error: