बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यात अपघाताचे सत्र सुरु असून रोजच अपघातामध्ये जिव गमवावा लागत असल्याच्या घटना घडत आहेत आज दुपारी आणखी मोटरसायकल अपघातात 23 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. तर 28 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर चोपडा रस्त्यावरील अजनाड पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावरील वळणावर समोरासमोर दोन मोटरसायकल यांच्यामध्ये धडक झाली.या अपघातात शिरपूर तालुक्यातील उंटावद येथून तोंदे येथे जात असलेल्या भीमा देविदास भिल वय 23 याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर समोरील मोटरसायकल वरील रामचंद्र हिरमल पावरा रा.महादेव वय 28 हा गंभीर जखमी झाला असुन त्याच्यावर उपचार सुरू आहे तर त्याच्या सोबत असलेले आई दुरीबाई हिरमल पावरा वय 60 या किरकोळ जखमी झाले आहेत. सदर घटना थाळनेर पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून भीमा भिल रा. उंटावद याला शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले.
