अरे काय हे ? दोन मोठ्या सापांना घेऊन महामार्गावर फिरतांनाचे दृश्य…

बातमी कट्टा:- दोन्ही हातात दोन मोठे साप धरुन तो महमार्गावर फिरत ये- जा करणाऱ्यांना त्याच्या करामती दाखवत होता.काही तरी बडबड करत हसत होता.दोन्ही सापांचे तोंड घट हातांनी धरुन ठेवल्याने दोन्ही सापांचे काही वेळानंतर हालचाल बंद झाल्याचे दिसून आले.हा सदर ईसम कोण ? त्या सापांना त्याने कुठे सोडले कुठून आणले होते यावर काही कारवाई झाली का? अशा एकना अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

सविस्तर व्हिडीओ

धुळे शहरातील चाळीसगाव चौफुलीवर एक ईसम दोन मोठ्या सापांना हातात पकडून फिरत होता.दोघा हातांनी दोन्ही सापांचे तोंड दाबून धरले होते.दोन्ही साप त्याच्या तावडीतून स्वताची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत होते. मात्र या सदर ईसमाने दोन्ही हातांनी दोन्ही सापांचे तोंड घट पकडले होते व काही वेळ तो अशा पद्धतीने रस्त्यावर फिरत होता.विशेष म्हणजे वाटेल ती बडबड करत हसत होता. ये – जा करणाऱ्यांना तो सापांना दाखवत होता.त्याच्या हातातून सुटण्यासाठी दोन्ही साप प्रयत्न करतांना दिसत होते.मात्र काही वेळा पासून सापांचे तोंड दाबून धरल्याने त्या सापांची हालचाल बंद झाल्याचे दिसून आले.

हा सदर ईसम कोण,त्याने हे मोठे साप कुठून आणले,दोन्ही सापांचे हालचाली बंद झाल्यानंतर त्यांना कुठे सोडण्यात आले. याबाबत संबधीत अधिकारींकडून याप्रकरणाची चौकशी झाली का ? यावर काय कारवाई होणार ? असे एकना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

On youtube

WhatsApp
Follow by Email
error: