
बातमी कट्टा:- नात्यातील एका सोबत पत्नीचे अनैतिक संबध असल्याच्या संशयावरुन पतीने पत्नीचा खून करुन तीला ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिल्याचे उघड झाले आहे.अर्धवट जळालेल्या स्थितीत महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर पोलीसांकडून चौकशी सुरु असतांना त्या मयत महिलेच्या पतीला ताब्यात घेतल्यानंतर त्याने खूनाची कबूली दिली आहे. पोलीसांनी घटनेच्या अवघ्या 24 तासाच्या आत संशयिताला ताब्यात घेतले आहे.

दि 31 रोजी सकाळच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील करवंद ते नटवाडे रस्त्यावरील रस्त्याच्याकडेला एका महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह मिळुन आला होता. घटनेची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी पोलीस प्रशासनाचे पथक दाखल झाले.त्या महिलेचे हात व पायाचा पंजा आणि छातीचा भाग वगळता संपूर्ण शरीर जळून खाक झाले होते.अशा भयंकर परिस्थितीत ही महिला नेमकी कोण ? याचा शोध घेणे पोलीस प्रशासनासमोर मोठे आवाहन उभे राहिले आहे.
आगीत संपूर्ण शरीर जळुन खाक झाल्याने महिला कोण हे संकट तर उभे आहेच मात्र या सोबतच त्या महिलेला अशा पध्दतीने रस्त्याच्या कडेला आणून कोणी पेटवले ? तीचा नेमका मारेकरी कोण ? हे शोध घेणे देखील पोलीसांसमोर मोठे आवाहन म्हणून उभे राहिले होते.याबाबत पोना रूपेश गांगुर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याघटनेचा पोलीसांनी तपास सुरु केला होता.
नटवाडे येथील सुनील रूलसिंग पावरा वय 26 याने शिरपूर शहर पोलीस स्टेशनात पत्नी निर्मला सुनिल पावरा वय 25 हि दि 20 पासून बेपत्ता असल्याची नोंद शिरपूर शहर पोलीस स्टेशनात केली होती.पोलीसांनी तात्काळ सुनील पावरा याला घटनास्थळी घेऊन जात मयत महिलेला दाखवीले असता प्रथमता ती महिला पत्नी निर्मला नसल्याचे सुनील पावरा याने पोलीसांना सांगितले. पोलीसांनी सुनील पावरा यांची आई यांना बोलवून मृतदेहाची ओळख पटवून दिली असता सदर महिला सुनील पावरा याची पत्नी असल्याचे सांगितले त्यानंतर पोलीसांनी सुनील पावरा याला सुळे गावातून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने अगोदर उडवाउडवीची उत्तरे दिली.मात्र पोलीसांनी सुनिल पावरा याला विश्वासात घेत विचारपूस केली असता पत्नी निर्मला पावरा हिच्या खूनाची कबुली सुनील पावरा याने पोलीसांना दिली.
सुनील पावरा याला पत्नी निर्मला पावराचे अनैतिक संबध असल्याचा संशय होता.सुनिल पावरा याच्या नात्यातील एका सोबत पत्नी निर्मला पावरा हिचे अनैतिक संबध असल्याचे संशयाचे भूत सुनील पावरा याच्या डोक्यात होते.बेपत्ता झालेली पत्नी निर्मला पावरा हिला शोधून आणल्यानंतर दि 31 रोजी सुनील पावरा याने पत्नी निर्मला पावरा हिला घेऊन जात तिचा दगडाने ठेचून खून केला व त्यानंतर तिच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिल्याची कबुली सुनील पावरा याने दिली आहे.याबाबत पोलीसांकडून सखोल तपास सुरु आहे.
घटनेच्या अवघ्या 24 तासाच्या आतच कौशल्युपुर्ण तपास करुन शिरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश फड,उपनिरीक्षक किरण बार्हे,संदिप मुरकुटे,उपनिरीक्षक गणेश कुटे ,मपोनि छाया पाटील, शोध पथकाचे ललित पाटील, लादुराम चौधरी,विनोद अखडमल,प्रविण गोसावी,गोविंद कोळी,मनोज दाभाडे,मुकेश पावरा,प्रशांत पवार,उमकांत वाघ,रुपेश गांगुर्डे, पंकज पाटील, संदिप ठाकरे,अनिता पावरा,जितेंद्र मालचे,रविंद्र महाले आदींनी कारवाई केली आहे.