बातमी कट्टा:- दिड वर्षापासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन पिडीतेस तीच्या 4 महिन्यांच्या मुलीसह संशयिताला गुजरात येथून पोलीसांनी ताब्यात घेत पिडीतेला वडिलांच्या स्वाधीन केले.तर संशयित विरुध्द पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शिरपूर शहरातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तीच्या वडीलांनी दि 11 जूलै 2020 रोजी शिरपूर शहर पोलीस स्टेशनात दाखल केली होती.याबाबत शहर पोलीसांकडून तीचा शोध घेण्यात येत होता.यादरम्यान शहर पोलीसांना गोपणीय माहिती मिळाली होती.त्या माहितीच्या आधारे शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी पोना.अशोक धनगर व पोकॉ अमोल पगारे,पो कॉ स्वाती शाह आदी जण गुजरात राज्यातील सुरत शहरात जाऊन तेथील पोलीसांच्या मदतीने सुरत येथील भीमनगर भागातून अल्पवयीन पिडीतेला तीच्या 4 महिन्याच्या मुलीसह शिरपूर किस्मतनगर येथील रवींद्र विक्रम भिल याला ताब्यात घेत शहर पोलीस स्टेशन येथे आणले.पिडीता अल्पवयीन असतांना बळजबरीने पळवून नेत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत 4 महिन्याची मुलगी झाली म्हणून शारिरीक व मानसिक त्रास दिल्याची तक्रार शहर पोलीस स्टेशनात दाखल करण्यात आली असून संशयित विक्रम भिल याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.