बातमी कट्टा:- मैत्रणीसोबत पायी जात असतांना भरधाव मोटरसायकलीने आलेल्या दोन संशयितांनी तरुणीच्या हातातील मोबाईल बळजबरीने हिसकावून दोन्ही संशयित पळून गेल्याची घटना घडली होती.शिरपूर पोलीसांना माहिती मिळाल्यानंतर घटनेच्या दोन तासात दोघा संशयितांना पोलीसांनी शिताफीने ताब्यात घेतले आहे.
शिरपूर शहरातील बालाजी नगर येथून फिर्यादी तरुणी तिच्या मैत्रीणीसोबत पायी पायी करवंद नाका येथील मंदिरात जात असतांना त्यांच्या मागुन भरधाव मोटरसायकलीवर दोन अज्ञात संशयित आले व त्यांनी फिर्यादी तरुणीच्या हातातून बळजबरीने मोबाईल हिसकावून दोन्ही संशयितांनी पोबारा केल्याची घटना दि २९ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली होती.या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ए.एस आगरकर यांच्यासह शोध पथक दाखल होत चौकशी करण्यात आली.तरुणीने शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केल्यानंतर शिरपूर पोलीस स्टेशनचे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांनी संशयिताचा शोध सुरु केला.यावेळी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोघांंना दोन तासात पोलीसांनी शिताफीने ताब्यात घेतले.दिलीप सुदाम कोळी व तुकाराम गोविंद मरराठे (ढिसले ) दोन्ही रा.वाल्मिकी नगर शिरपूर असे दोघांचे नाव असून त्यांच्याकडील मोटरसायकल देखील चोरीची असल्याचे उघड झाले आहे. यातील संशयित दिलीप सुदाम कोळी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर राज्यासह ईतर राज्यात एकुण १७ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड,अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ए.एस आगरकर,पोलीस शोध पथकाचे ललित पाटील, लादुराम चौधरी,मनोज पाटील, विनोद अखडमल,गोविंद कोळी,योगेश दाभाडे,मुकेश पावरा,प्रशानत पवार,मनोज दाभाडे,सचिन वाघ,भटु साळुंके तसेच होमगार्ड मिथुन पवार,चेतन भावसार,शरद पारधा व आकाश पावरा अशांनी मिळुन केली आहे.