आगीत “दोन कोटी” पेक्षाही जस्तीचे नुकसान…

बातमी कट्टा:- प्रियदर्शनी सहकारी सुतगिरीणीच्या गोडाऊनला आग लागल्याची घटना दि 27 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली होती.या आगीत दोन कोटीं पेक्षाही अधिक रकमेच्या गोडाऊन मधील कापसाचे गाठी जळून खाक झाले आहेत. धुळे ,दोंडाईचा आणि शिरपूर येथील अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले होते.रात्रभर आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु होता.

व्हिडीओ बातमी

दि 27 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील तांडे परिसरातील चोपडा रस्त्यावर असलेल्या प्रियदर्शनी सुतगीरीणीच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली होती.ही आग ईतकी भीषण होती की यात संपूर्ण कापसाचे गाठी खाक झाले होते.या आगीत एक लाख 94 हजार 136 किलो वजनाच्या कापसाच्या एक हजार 224 गाठी,28 हजार 236 किलो वजनाचे वेस्ट कॉटन असा एकुण दोन कोटी 41 लाख 61 हजार 917 रूपये किंमतीचा मुद्देमाल जळून खाक झाला.घटनेची माहिती प्राप्त होताच थाळनेर पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते.आग आटोक्यात आणण्यासाठी शिरपूर नगरपरिषदेच्या अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले होते तर धुळे व दोंडाईचा येथून देखील अग्निशमन बंब घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.सदर आग रात्रीभर आटोक्यात आली नव्हती.याबाबत थाळनेर पोलीस स्टेशनात नोंद करण्यात आली आहे.

व्हिडीओ बातमी
WhatsApp
Follow by Email
error: