
बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यातील बोराडी येथे अपक्ष उमेदवार डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांची प्रचार सभा संपन्न झाली.यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.तालुक्यातील हुकूमशाही, भ्रष्टाचार आणि विकासाच्या नावाने सुरु असलेल्या भंपकगिरीचा डॉ जितेंद्र ठाकूर यांनी समाचार घेतला.
डॉ जितेंद्र ठाकूर बोलतांना म्हणालेत की खोटा विकासाची भंपकगीरी करुन शिरपूर तालुक्यातील मायबाप जनतेला फसवण्याचे काम आमदार करत असतात मात्र आता जनतेला सर्व काही कळून आले आहे.मात्र आता ही जनता परिवर्तन घडवल्या शिवाय राहणार नाही.डॉ ठाकूर पुढे बोलतांना म्हणालेत की विधानसभा सभा निवडणूकीची मुख्य लढत माझ्यात आणि काशिराम पावरांचा यांच्यात आहे.आमदार काशिराम पावरा यांनी तालुक्यात काय विकास कामे केली ? येथिल गोरगरीब जनतेच्या मोफत शैक्षणिक,आरोग्यसेवेसाठी आमदार पावरांनी काही एक कार्य केलेले नाही.तरुणांची बेरोजगारी वाढली आहे.उद्योग धंदे आणलेत नाही. आमदारांनी आजतागायत मतांचा अपमान केला आहे . तालुक्यातील जनतेच्या मतांमुळे निवडून आलेले आमदारांना जनतेच काही काही एक घेनदेनं नाही ते फक्त एका कुटूंबाची सेवा करतात.लोकशाही साठी हे घातक आहे.त्यामुळे ही निवडणूक फार गंभीर आहे.उच्चशिक्षित उमेदवाराला मतदान करुन आमदार बनवून विधानसभेत पाठवले तर जनतेचे तालुक्याचे प्रश्न सोडवण्यासाठी विधानभवनात आवाज उठवू असे यावेळी डॉ जितेंद्र ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले.
प्रचार सभेत अमित जैन यांनी आपल्या भाषणात सांगितले की शिरपूर तालुक्यातील आदिवासी भागात तालुक्यातील सत्ताधारींकडून वारंवार अन्याय करण्यात येतो.आदिवासी समाजाचे हक्काची योजना ठक्कर बापा योजनेला स्थगिती देऊन आदिवासी भागातील विकास थांबवण्याचे षडयंत्र तालुक्यातील दोन्ही आमदारांकडून करण्यात आले.सांगवी दंगल प्रकरणात देखील राजकारण करण्यात आले.आमदारांनी या ३५ वर्षात स्वताच्या नावाने अनेक इमारती उभारल्या मात्र आदिवासी महापुरुषांच्या नावाने एक इमारत उभारु शकले नाही असा घणाघाती अमित जैन यांनी केले.आदिवासी संघटनेचे सुंदर पावरा यांनी देखील आदिवासी भागात आमदारांकडून झालेला अन्यायाला वाचा फोडली.
