बातमी कट्टा : माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल व आमदार काशिराम पावरा यांच्या प्रयत्नाने शिरपूर तालुक्यातील इतिहासात रस्ते व विविध कामांसाठी 1 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त विक्रमी निधी मंजूर झाला आहे.
महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केल्याने 9 मार्च 2023 रोजी शिरपूर तालुक्याचे रस्ते, पूल व दोन शासकीय इमारतींसाठी 187 कोटी 6 लाख 35 हजार रुपयांचा खूपच भरघोस निधी मंजूर झाला आहे.
तसेच या व्यतिरिक्त “हायब्रीड अॅन्युटी मॉडेल, (हॅम) अंतर्गत मालकातर-कोडीद-बोराडी-नांदर्डे-वाडी-वाघाडी-जातोडे-बाळदे-गिधाडे (ता. शिरपूर) या एकूण 47 कि.मी. लांबीच्या रस्त्यासाठी सुमारे 550 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
यात नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. हिनाताई गावित तसेच माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांच्या आदिवासी भागासाठी आर्थिक निधीचा सहभाग आहे.
त्याचप्रमाणे आशियाई बँक अर्थसहाय्य निधी मधून रा.म.मा. 3 आढे-थाळनेर-मांजरोद-होळनांथे-मांजरोद-बभळाज (ता. शिरपूर) प्रजिमा 12 रस्त्याची एकूण लांबी 42 कि.मी. कामासाठी देखील सुमारे 300 कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर झाला आहे.
उद्योगपती चिंतनभाई अमरिशभाई पटेल यांनी शिरपूर तालुक्यातील अंतुर्ली गावाजवळील लेंडी नाल्यावरील पुलासाठी आमदार अमरिशभाई पटेल यांच्याकडे पाठपुरावा केल्याने 4 कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पात मंजूर झाला आहे. याबद्दल अंतुर्ली व परिसरातील ग्रामस्थांनी चिंतनभाई पटेल यांच्यासह आमदार अमरिशभाई पटेल व आमदार काशिराम पावरा यांचे मनापासून आभार मानले आहेत.
…………………………………………………………………………………………………
महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात अंतुर्ली गावाजवळ लेंडी नाल्यावर पूल बांधकामासाठी उद्योगपती चिंतनभाई अमरिशभाई पटेल यांच्या पाठपुराव्यामुळे 4 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
शिरपूर शहरात उपविभागीय अधिकारी यांच्या निवासस्थान बांधकामासाठी 94 लाख रुपये मंजूर झाले आहेत.
पळासनेर येथे राज्य शुल्क निरीक्षक शासकीय कार्यालय बांधकामासाठी 4 कोटी 5 लाख 47 हजार रुपये मंजूर.
आदिवासी भागातील सहा राज्य रस्ते कामांसाठी 12 कोटी 50 लाख रुपये मंजूर झाले आहेत. यात खंबाळे ते आंबे रस्ता सुधारणा 1 कोटी 50 लाख रुपये, महादेव ते भोईटी रस्ता सुधारणा 3 कोटी 50 लाख, सुळे गावाजवळ पळासनेर हाडाखेड रस्त्यावर काँक्रीट डिव्हायडर बांधकाम 50 लाख, तापी नदी संरक्षक भिंत थाळनेर ते भाटपुरा 4 कोटी 50 लाख, पळासनेर गावाजवळ पळासनेर हाडाखेड रस्त्यावर काँक्रीट डिव्हायडर बांधकाम 50 लाख, खामखेडा ते वरला जलनि:स्सारण काम 2 कोटी रुपये.
शिरपूर तालुक्यातील बिगर आदिवासी भागातील 37 कामांसाठी 83 कोटी 20 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यात जुनापाणी ते निमझरी रस्ता सुधारणा 4 कोटी 50 लाख रुपये, उमर्दे ते चारणपाडा गावापर्यंत रस्ता सुधारणा 2 कोटी 75 लाख, पनाखेड गाव काँक्रीट रस्ता 75 लाख, फत्तेपुर फाटा ते फत्तेपूर गाव रस्ता सुधारणा 2 कोटी 50 लाख, डबक्यापाडा रस्ता सुधारणा 2 कोटी 50 लाख, वाठोडा ते जैतपूर रस्ता सुधारणा 2 कोटी, लाकडया हनुमान गाव रस्ता कॉंक्रिटीकरण 1 कोटी, राष्ट्रीय महामार्ग 3 ते आमोदे डायव्हर्शन रस्ता काँक्रिटीकरण 3 कोटी, सावळदे ते उंटावद रस्ता कॉंक्रिटीकरण 10 कोटी, वाघाडी फाटा ते जातोडे रस्ता सुधारणा 3 कोटी 50 लाख, सुळे गावाजवळ रस्ता कॉंक्रिटीकरण 2 कोटी, उंटावद खर्दे रोड अरुणावती नदीला संरक्षक भिंत काम 60 लाख, वाघाडी गावाजवळ संरक्षक भिंत व गटर कॉंक्रिटीकरण 1 कोटी 30 लाख, आढे-थाळनेर-मांजरोद रोडवर काँक्रीट गटर 80 लाख, करवंद गावा जवळ काँक्रीट रस्ता 2 कोटी 50 लाख, खंबाळे ते रोहिणी रस्ता सुधारणा 3 कोटी 50 लाख, कुरखळी ते सावळदे रस्ता सुधारणा 1 कोटी 50 लाख, तऱ्हाडी ते ममाने ते जुनी अंतुर्ली रस्ता सुधारणा 2 कोटी 40 लाख, सांगवी-होऱ्यापाणी-वरझडी रस्ता सुधारणा 3 कोटी, होळनांथे गावातील आर. सी. पटेल शाळेजवळ काँक्रीट गटर व संरक्षक भिंत 3 कोटी 50 लाख, होळनांथे ते मांजरोद व मांजरोद ते तापी नदी रस्ता सुधारणा 1 कोटी, मांजरोद ते घोडसगाव फाटा होळनांथे गाव 50 लाख, अभाणपूर ते तऱ्हाडी रस्ता सुधारणा 2 कोटी 40 लाख, जुने भामपूर रस्ता व गटर काँक्रीटीकरण 2 कोटी, थाळनेर ते रा.मा.-4 रस्ता सुधारणा 2 कोटी 50 लाख, जुने मांजरोद ते जापोरा रोड सुधारणा व पूल बांधणे 4 कोटी, कळमसरे ते रा.म.52 रस्ता सुधारणा 2 कोटी, खर्दे बु. बाभुळदे रस्ता सुधारणा 1 कोटी 50 लाख, थाळनेर असली रस्ता 1 कोटी, तऱ्हाडी ते तऱ्हाडकसबे रस्ता 2 कोटी, चांदपुरी जातोडा रस्ता सुधारणा 2 कोटी, भटाणे ते अभाणपूर रस्ता सुधारणा 2 कोटी, पिळोदा घोडसगाव रस्ता 1 कोटी 60 लाख, उप्परपिंड रस्ता सुधारणा 90 लाख, वाघाडी वाडी रस्ता सुधारणा 2 कोटी 50 लाख, ताजपुरी रस्ता सुधारणा 70 लाख, रुदावली ते टेंभे रस्ता 1 कोटी रुपये.
शिरपूर तालुक्यातील आदिवासी भागातील 33 कामांसाठी 81 कोटी 70 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यात रा.म.3 ते खैरखुटी रस्ता सुधारणा 2 कोटी 90 लाख रुपये, साटीपाणी ते आंबा फाटा पूल व ड्रेनेज बांधकाम व सुधारणा 3 कोटी 50 लाख, रा. मा. 4 ते सावेर रस्ता सुधारणा 1 कोटी 20 लाख, शेमल्या ते चारण पाडा रस्ता सुधारणा 2 कोटी 60 लाख, सटीपाणी ते व्ही.आर.82 रस्ता सुधारणा 1 कोटी, गुऱ्हाळपाणी ते धाबादेवी रस्ता सुधारणा 4 कोटी, पिंप्राडपाडा रस्ता जलनि:स्सारण काम व सुधारणा 2 कोटी 50 लाख, धाबादेवी ते एम.डी.आर.5 रस्ता सुधारणा 4 कोटी, रा.मा.4 ते चांदपुरी रस्ता सुधारणा 1 कोटी 75 लाख, लाकडया हनुमान-नवापाडा-आसरापाणी रस्ता जलनि:स्सारण 2 कोटी, जामन्यापाडा ते बाखर्ली रस्ता जलनि:स्सारण 2 कोटी 75 लाख, बोराडी ते तिखीबर्डी काँक्रीटीकरण व रस्ता सुधारणा 2 कोटी 50 लाख, निमझरी गावाजवळ रस्ता 1 कोटी, निमझरी गावाजवळ संरक्षक भिंत 1 कोटी 50 लाख, निमझरी गावाजवळ पूल बांधणे 1 कोटी 50 लाख, नांदर्डे वासर्डी रस्ता छोटा पूल व स्लॅब ड्रेन 1 कोटी 50 लाख, बोराडी ओडीआर 39 ते विद्यानगर रस्ता बांधकाम व जलनि:स्सारण 2 कोटी 50 लाख, बोराडी चिंचपाणी रस्ता बांधकाम व जलनि:स्सारण 2 कोटी, नांदर्डे ते सामऱ्यापाणी रस्ता बांधकाम व जलनि:स्सारण 2 कोटी 50 लाख, दुर्बळया ते गव्हाणपाडा रस्ता बांधकाम व जलनि:स्सारण 2 कोटी, फत्त्पूर ते रतन लालसिंगपाडा रस्ता बांधकाम व जलनि:स्सारण 1 कोटी 50 लाख, साकऱ्यापाडा ते इंगनपाडा रस्ता बांधकाम व जलनि:स्सारण 2 कोटी, मुखेड ते ओडीआर 38 रस्ता बांधकाम व जलनि:स्सारण 2 कोटी, न्यू बोराडी ते चोंदीपाडा रस्ता बांधकाम व जलनि:स्सारण 2 कोटी 50 लाख, बोराडी ते खाऱ्याखानपाडा रस्ता बांधकाम व जलनि:स्सारण 1 कोटी 50 लाख, फत्तेपूर बोरपाणी रस्ता बांधकाम व जलनि:स्सारण 1 कोटी, तोंदे (गोरक्षनाथ मंदिर) ते मलखाण नगर हिसाळे रस्ता बांधकाम व जलनि:स्सारण 2 कोटी, खैरखुटी ते चाचऱ्यापाणी रस्ता बांधकाम व जलनि:स्सारण 1 कोटी 50 लाख, बभळाज ते भिवरखेडा रस्ता बांधकाम व जलनि:स्सारण 1 कोटी 50 लाख, हिवरखेडा ते रामबर्डी रस्ता बांधकाम व जलनि:स्सारण 5 कोटी, हिगाव ते नटुपाडा रस्ता व पूल बांधकाम 9 कोटी, हिवरपाडा ते झरीपाडा रस्ता बांधकाम व जलनि:स्सारण 3 कोटी 50 लाख, टेंभेपाडा-नवापाडा-बुडकीविहीर रस्ता बांधकाम व जलनि:स्सारण 2 कोटी 50 लाख.
या सर्व कामांबद्दल शिरपूर तालुक्यातील जनतेने आमदार अमरिशभाई पटेल व आमदार काशिराम पावरा यांचे मनापासून आभार मानले आहेत.