आरोग्यसेवक गोकुळ राजपूत यांचा स्त्यूत्य उपक्रम,वडिलांच्या गंधमुक्ती कार्यक्रमाला रक्तदान शिबिर…

बातमी कट्टा:- आरोग्यसेवक गोकुळ राजपूत यांनी आपल्या वडिलांच्या निधनानंतर शोकमग्न न राहता समाजात एक स्त्यूत्य उपक्रम राबवून आदर्श पायंडा पाडला आहे. त्यांनी आपल्या वडिलांच्या गंधमुक्तीच्या कार्यक्रमाला रक्तदान शिबिर घेऊन रक्तदानाच्या माध्यमातून अनेक रुग्णांना जीवदान देण्याच्या काम केले आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली आरोग्यसेवक म्हणून गोकुळ राजपूत हे वैद्यकीय क्षेत्रात काम पाहत असतात. मागील आठवड्यात गोकुळ राजपूत यांचे वडील भागवतसिंह जिभाऊ राजपूत यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. स्व. भागवतसिंह राजपूत यांच्या गंधमुक्तीचा कार्यक्रम दि. 11 ऑक्टोबर रोजी संपन्न झाला.

गोकुळ राजपूत आणि त्यांच्या परिवाराला वडीलाच्या निधनाचे दुःख तर आहेच मात्र त्याच दुःखात शोकमग्न न राहता त्यांनी गंधमुक्तीच्या दिवशी रक्तदान शिबिर घेऊन समाजामध्ये एक नवा आदर्श पायंडा पाडला आहे. गोकुळ राजपूत यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक केले जात आहे. रक्तदान शिबिरामुळे अनेक जणांचे प्राण वाचवण्यास मदत होणार आहे. यावेळी नातेवाईकांसह गोकुळ राजपूत यांच्या मित्रपरिवाराने स्वयंस्फूर्तीने 51 जणांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराला जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस डॉ. दरबारसिंग गिरासे, खरेदी-विक्रीचे चेअरमन लहू पाटील, जि.प. सदस्य सौ. धरतीताई देवरे,निखिल देवरे, ज्येष्ठ पत्रकार गो.पी. लांडगे, संतोष राजपूत,पं. स. राजू शर्मा, पंकज पाटील, सरपंच गुलाब सैंदाणे, नरेंद्र जमादार, ज्येष्ठ नेते भीमसिंग राजपूत, प्रा. व्ही.डी. सिसोदिया डॉ.एस.के. पाटील, राम सोनवणे, चुनीलाल पाटील, उत्तमसिंग राजपूत, नथू वाघ, एस.के. पाटील, लालसिंग पाटील, निंबा राजपूत, जितेंद्र राजपूत, रवींद्र राजपूत, दिलीप राजपूत, जगतसिंग सूर्यवंशी, यादवराव राजपूत, साहेबराव राजपूत, अभिजीत सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

WhatsApp
Follow by Email
error: