बातमी कट्टा:- शिरपूर शहरातील आर सी पटेल प्राथमिक शाळा येथे लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त घेण्यात आलेल्या ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ घेण्यात आला. यावेळी या शाळेतून बदली होऊन गेलेल्या शिक्षकांना निरोप देण्यात आला तर विद्यालयातील इंग्रजी शिक्षक जितेंद्र करंके यांनी केलेल्या आदर्श विवाहानिमित्त त्यांना सहकाऱ्यांच्या वतीने भेटवस्तू देण्यात आली.
कार्यक्रमाला शिरपूर पीपल्स बँकेचे संचालक तथा भुपेशभाई ग्रीन आर्मीचे संजय चौधरी,नगरसेवक चंद्रकांत सोनवणे, लिनेस क्लबच्या सदस्या डॉ. नलिनी राठी, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका मिनल स्वर्गे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय वरसाळे विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.डी. पाटील आदी उपस्थित होते.

कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अध्यापन नियमितपणे सुरु आहे. शाळेतील शिक्षक अभ्यासासाठी सातत्याने व्हाट्सअँप,गुगल क्लासरूम व झूम च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन संपर्कात असतात.यात शंभर टक्के विद्यार्थ्यांच्या सहभागाचा सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. यासोबतच विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या अध्यापनासोबत विविध सहशालेय उपक्रम ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहेत.या अंतर्गत लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली होती.या स्पर्धेत जवळपास ११० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.यातून जवळपास ४५ विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.
विद्यालयात अध्यापनासोबत दर शनिवार सहशालेय उपक्रम घेण्यात येतात.या अगोदरही या उपक्रमा अंतर्गत वेशभूषा स्पर्धा, श्लोक स्पर्धा घेण्यात आली होती.तर स्पर्धा घेतल्यानंतर बक्षिसे ही देण्यात येतात.सहशालेय उपक्रमांत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढत असल्याने ऑनलाईन अध्यापनातही त्याचा उपयोग होतांना दिसत आहे.विद्यालयाच्या वतीने सदर उपक्रम हे विद्यार्थ्यांचे उच्चारण, पाठांतर,सभाधिटपणा अंगी बानावा या उद्देशाने राबविण्यात येत आहेत.
यावेळी या विद्यालयातून बदली झालेल्या शिक्षकांना निरोपही देण्यात आला.तसेच विद्यालयातील इंग्रजी शिक्षक व दिव्यांग असलेल्या जितेंद्र करंके यांनी आदर्श विवाह केल्याने त्यांना विद्यालयातील शिक्षकांच्या वतीने संसारासाठी उपयोगी असलेल्या भेटवस्तू देण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरपूर पीपल्स बँकेचे संचालक व शिरपूर ग्रीन आर्मीचे संजय चौधरी होते.तर सुत्रसंचालन विवेकानंद ठाकरे, महेंद्र माळी, अशोक पाटील यांनी केले.व आभार गजेंद्र जाधव यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशांत चौधरी, विनोद माळी,वसंत भामरे,गणेश चौधरी, के.डी. राजपूत, योगेश बागुल,पुनम सूर्यवंशी यांच्यासह सागर पवार,सतिष पाटील,शरद पाटील, यशोदा पाटील यांनी परिश्रम घेतले.