
बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यातील बोराडी येथे झालेल्या आदिवासी समाजाच्या आंतरराष्ट्रीय आदिवासी हक्क आणि अधिकार दिवस कार्यक्रमात आमदार काशिराम पावरा यांची अनुपस्थिती मुळे वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत.आमदार काशिराम पावरा यांच्या गैरहजेरी मागील नेमके कारण काय ?याबाबत व्यक्तीशा कोणालाही काही लेनदेन नाही मात्र आदिवासी समाजाच्या हक्काचा दिवस समजल्या जाणाऱ्या आदिवासी अधिकार दिवस कार्यक्रमात आमदार काशिराम पावरा यांनी संबोधित करणे आवश्यक होते हे तितकेच खरे आहे.

शिरपूर तालुक्यातील बोराडी येथे आदिवासी समन्वय मंच भारत आणि सर्व आदिवासी संघटना यांच्या वतीने आदिवासी अधिकार दिवसाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांचे नाव होते.मात्र या कार्यक्रमात आमदार काशिराम पावरा यांची गैरहजेरी बघायला मिळाली.यासोबत खासदार गोवाल पाडवी यांची देखील कार्यक्रमात अनुपस्थिती बघायला मिळाली.
आंतरराष्ट्रीय आदिवासी हक्क आणि अधिकार दिवस हा यंदा अठरावा आदिवासी अधिकार दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी समाजाची उपस्थिती बघायला मिळाली.एकीकडे तालुक्यात आदिवासी समाज अत्यंत महत्वाचा दिवस साजरा करत असतांना पत्रिकेत घोषित करण्यात आल्याप्रमाणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले तालुक्यातील आमदार काशिराम पावरा यांची गैरहजेरी मुळे वेगवेगळ्या चर्चा रंगू लागले आहेत.तालुक्यात एकाच ठिकाणी शेकडो आदिवासी समाज एकत्र येत अधिकार दिन साजरा करतांना त्या कार्यक्रमात आमदारांची का अनुपस्थिती होती ? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.विशेष म्हणजे आमदार पावरा या कार्यक्रमाच्या दिवशी तालुक्यातच होते. सांगवी येथील मंदिर प्रतिष्ठापना कार्यक्रमाला ते हजर होते. मात्र आपल्याच समाज बांधवांनी आयोजित केलेल्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला त्यांनी दांडी का मारली असावी याविषयी वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.आमदार म्हटले म्हणजे तालुक्याचा भरपूर कामाची जबाबदारी अंगावर असते. कदाचित तालुक्यातील कामाच्या या ओझ्या खाली आमदार काशिराम पावरा यांना या आदिवासी समाजाच्या हक्काच्या आंतरराष्ट्रीय आदिवासी हक्क आणि अधिकार दिवस कार्यक्रमात येणे शक्य झाले नसावे.