ईको आणि पिकअपचा भीषण अपघात,पाच जणांचा जागीच मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी

बातमी कट्टा:- भरधाव पिकअप वाहनाने इको वाहनाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला आहे या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू तर तिघांवर धुळे येथील हिरे मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिंदखेडा तालुक्यातील वारुड येथून मध्यरात्री किर्तनाचा कार्यक्रम आटोपून घरी परत येणाऱ्या इको वाहनाला शिंदखेडा जवळील दसवेल फाट्याजवळ भरधाव येणाऱ्या पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली.हा अपघात इतका भीषण होता की अपघातात इको वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाले आहे. या अपघातात इको वाहनातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.मयतांमध्ये शिंदखेडा शहरातील मंगलबाई लोटन देसले (वय ५५) , विशाखा आप्पा महाजन (वय १२), मयुरी पिंताबर परदेशी (२२), परसामळ येथील सुनील दंगल कोळी (२८) वारुड येथील जयेश गुलाब बोरसे (२१) यांचा समावेश आहे.जखमींना धुळे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: