उत्तर महाराष्ट्रात उत्कृष्ट आरोग्यसेवा देणाऱ्या श्री.सिध्देश्वर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे आता अद्यावत न्युरो / स्पाईन सह ईतर सुपरस्पेशालिस्ट सुविधांचा प्रारंभ

संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात उत्कृष्ट आरोग्य सेवा देत असलेल्या श्री सिध्देश्वर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे आता मेंदू व मणक्यांच्या विकारांचे तज्ञ,स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र तज्ञ तसेच जनरल फिजिशियन व अतिदक्षता तज्ञ यांची सेवा पुर्णवेळ उपलब्ध झाली आहे. सुप्रसिद्ध मेंदू शल्य चिकित्सक डॉ निखील शहा,सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ सुनील नाईक, सुप्रसिद्ध फिजिशियन डॉ. अनिल रघुवंशी यांच्या हस्ते या नविन सुविधांचा रविवारी दि 24 शुभारंभ करण्यात आला आहे.

श्री.सिध्देश्वर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे नव्याने रुजू झालेले डॉ अभिजित चंदनखेडे हे अनुभवी न्युरोसर्जन असून मेंदूच्या तसेच मणक्यांच्या विकारांसह,अपघात नंतरचे मेंदूचे व मणक्यांच्या तातडीच्या शस्त्रक्रिया,मेंदूच्या गाठी,मेंदूच्या तसेच मणक्यांच्या दुर्बिणीतून शस्त्रक्रिया, लहान मुलांमधील मेंदूचे विकार व त्यावरील शस्त्रक्रिया यामध्ये त्यांचे विशेष प्रावीण्य आहे. तर गोल्ड मेडलिस्ट अनुभवी स्त्री रोग तज्ञ डॉ रोझा पाटील यांच्या स्त्रीरोग दालनाचे उदघाटन डॉ सुनिल नाईक हस्ते करण्यात आले.यावेळी डॉ सुनिल नाईक यांनी मार्गदर्शन केले.उपचारादरम्यान स्त्री रोग थज्ञ यांना कशा प्रकारे परिपूर्ण टिम ,सुसज्ज आय.सी.यु तसेच प्रशिक्षीत डॉक्टर,भूलतज्ञ आदींनी गरज असते आणि श्री सिध्देश्वर मल्टीस्पेशालिटी येथे परिपूर्ण टिम असल्याचे समाधान डॉ नाईक यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी जनरल फिजिशियन तसेच अतिदक्षता तज्ञ व रक्तदाब,मधुमेह, ह्रदय विकारांच्या चिकित्सक डॉ संकेत जैन त्यांचे विशेष यांच्या श्री.सिध्देश्वर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथील दालनाचे सुप्रसिद्ध डॉ.अनिल रघुवंशी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी एका योग्य फिजिशियन व अतिदक्षता तज्ञाची कशी अवश्यकता असता असते याचे महत्त्व डॉ रघुवंशी यांनी सांगितले.

यावेळी श्री सिध्देश्वर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डिरेक्टर डॉ जितेंद्र ठाकूर यांनी हॉस्पिटल मध्ये उपलब्ध सुविधांचा अहवाल दिला तसेच चांगली रुग्णसेवा या हॉस्पिटलच्या माध्यमातून धुळेकर जनतेला देता आली व ती अशीच देत राहू याबद्दल आनंद डॉ ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला.तर हॉस्पिटलचे डिरेक्टर डॉ सजय संघवी यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री सिध्देश्वर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल विषयी...

उत्तर महाराष्ट्रात श्री सिध्देश्वर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सन 2011 मध्ये डॉ. संजय संघवी,डॉ. जितेंद्र ठाकूर, डॉ. नैनेश देसले,डॉ हरीश मेहरा यांनी स्वताच्या आधीच्या रुग्णालयांमधील सेवा बंद करून पूर्णवेळ एकाच ठिकाणी रूग्णांना सर्व सुविधा मिळाव्यात या हेतूने स्थापन केली.धुळेकरांना नाविन्यपूर्ण आणि वाजवी दरात उत्कृष्ट वैद्यकीय सेवा देणारे रुग्णालय उपलब्ध करून दिले आहे.11 वर्षांच्या काळात या रुग्णालयाने धुळे जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात मोठा नावलौकिक मिळविला आहे. विशेषता कोविड काळात श्री सिध्देश्वर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने अनेकांना अक्षरशः जीवदान दिले आहे.
मेट्रो सिटींसारख्या मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या अनेक वैद्यकीय सेवा आज सिध्देश्वर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत.सुमारे 105 बेड क्षमता असलेल्या या रुग्णालयात सर्व सुविधांनी सुसज्ज असा अतिदक्षता विभाग,सुसज्ज असे 3 ऑपरेशन थिएटर, डायलिसिस सुविधा,सी.टी.स्कँन,पॅथॉलॉजी लॅब,एक्सरे रुम,सोनोग्राफी इत्यादी परिपूर्ण सुविधा उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य शासन संचालित महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत तसेच केनद्रशासनाच्या प्रधानमंत्री जनआरोग्य योजने अंतर्गत उपचार देखील या रुग्णालयात केले जातात.एवढेच नव्हे तर विविध विमा कंपन्यांच्या मेडिक्लेम सुविधाही श्री सिध्देश्वर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मार्फत पुरविल्या जातात.विशेषता महाराष्ट्र वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठीची मेडीअसिस्ट टी.पी.ए अंतर्गत कॅशलेस उपचारांची सोय सुविधा देखील या रुग्णालयात उपलब्ध आहेत.

WhatsApp
Follow by Email
error: