
बातमी कट्टा:- एकाच रात्रीत तब्बल ५ ते ६ ठिकाणी घरफोडी झाल्याची घटना आज दि ८ रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे.शिरपूर तालुक्यात चोरींच्या वाढत्या घटनेंमुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.


मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील गिधाडे आणि उप्परपिंड गावात चोरांनी घरफोडी करत लाखोंचा मुद्देमाल चोरी केल्याचे आज सकाळी उघड झाले. गिधाडे येथे चार बंद घरांचे कुलूप तोडत घरफोडी करण्यात आली आहे.तर उप्परपिंड गावात घरातील सदस्य झोपलेल्या ठिकाणाहून पेटी चोरुन शेतात घेऊन जात त्यातील रोख रक्कम व दागिने चोरी केल्याचे उघड झाले आहे.

गिधाडे येथील बापू गिर गिरधर गोसावी,सुभाष चंद्रसिंग गिरासे,अनंत शिवाजी साळुंखे आदींच्या घरी घरफोडी झाली आहे तर उप्परपिंड येथे कांतीलाल पाटील व हंभर सरदारसिंग राजपूत यांच्या घरी चोरी झाली आहे.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शिरपूर शहर पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले असून चौकशी सुरू आहे.
