एटीएम कार्ड हातचालाखीने बदलून व क्लोरींग करून फसवणूक करणाऱ्या टोळी ताब्यात…

बातमी कट्टा:- एटीएम मध्ये हातचालाखी करत पैसांची फसवणूक केल्याच्या घटनेत वाढ झाली होती.याबाबत स्थानिक गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील संशयितांचा शोध घेण्यात येत होता.ज्या एटीएम वर एटीएम कार्ड बदलणे किंवा बँक खात्यातील पैसे परस्पर काढल्याच्या घकना घडल्या होत्या तेथील सी.सी.टीव्ही फुटेज व तांत्रिक बाबींची तपासणी केली असता सदर टोळी ही हरियाणा येथील असल्याचे लक्षात आले होते.हरीयाणा पासींगची चारचाकी वाहन मालेगाव येथून धुळ्याकडे येत असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाहन ताब्यात घेत वाहनातील तिघांची चौकशी केली असता त्यांनी हातचालाखी करत पैशांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र व गुजारात राज्यात देखील विविध ठिकाणी अशा प्रकारे गुन्हा केल्याची त्यांनी कबुली दिली आहे.

धुळे जिल्ह्यात विविध पोलीस स्टेशन हद्दीत एटीएम मध्ये पैसे काढायला जाणाऱ्या लोकांची हातचालाखीने कार्ड बडलून पैशांची फसवणूक करणे किंवा परस्पर पैसे काढणे सारखे गुन्हे दाखल होते याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून तपास सुरु असतांना ज्या एटीएम मध्ये अशा पध्दतीने घटना घडल्या आहेत तेथे तपास करुन सी.सी.फुटेज व तांत्रिक बाबींची स्थानिक गुन्हे शाखेने तपास केला असता सदर गुन्हे हरियाणा येथील हिसार येथील संशयितांकडून केले जात असल्याची माहिती प्राप्त झाली होती.

दि 1 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना माहिती मिळाली की मालेगाव येथून धुळेच्या दिशेने हरीयाणा पासिंगची एस.यु.व्ही कार क्र.एच.आर.80 डी.3982 येत असल्याची समजले त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चाळीसगाव रोड चौफुली जवळ सापळा रचला असता तेथे सदर कार ताब्यात घेत चौकशी करण्यात आली.त्यात विजयकुमार पालाराम राजपूत वय 35 , सुनिलकुमार धुपसिंग राजपूत वय 32,शिवकुमार चंदकिशोर शर्मा 38 व एक विधी संघर्ष बालक सर्व रा.हिसार हरीयाणा यांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांच्याकडे 1 लाख 30 हजार रोख रक्कम,20 हजार किंमतीचे 7 मोबाईल,8 लाखाची कार,6 हजार किंमतीचे एटीएम कार्ड स्वाईप व क्लोन करण्याचे स्किमर मशीन ,3 हजार किंमतीचे स्किमर मशीन व वेगवेगळ्या बँकेचे 66 एटीएम कार्ड असा एकुण 9 लाख 59 हजारांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेत कारवाई केली आहे.

सदर संशयितांनी धुळे शहरासह देवपूर भागातील एटीएम तसेच नाशिक पुणे ,ठाणे, मुंबई,नागपूर सह मध्यप्रदेश, राजस्थान गुजरात राज्यात देखील अशा प्रकारे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.सदर कारवाई स्थानिक शाखेचे निरीक्षक शिवाजी बुधवंत,सपोनि प्रकाश पाटील,योगेश राऊत, बाळसाहेब सुर्यवंशी,संजय पाटील,प्रकाश सोनार,कुनाल पानपाटील,संदिप सरग,उमेश पवार,रविकिरण राठोड,विशाल पाटील,पंकज खैरमोडे,सुनिल पाटील,मनोज महाजन आदींनी केली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: