
बातमी कट्टा:-शेतकरी कुटूंब घरात झोपलेले असतांना पहाटेच्या सुमारास घरातील कपाटातून 14 तोळे सोने व 90 हजारांपेक्षा जास्तीची रोकड चोरट्यांनी चोरल्याची घटना आज दि 11 रोजी घडली.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस पथक दाखल झाले होते.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील खर्दे बु.येथील गावदरवाजा समोर मगन बाबुलाल गुजर यांच्या राहत्या घरी पहाटेच्या सुमारास घरफोडी झाल्याची घटना घडली आहे. मगन गुजर कुटूंबासह घरात झोपलेले असतांना घराच्या मागील दरवाजाचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी घरातील कपाटात असलेल्या 14 तोळे सोने व 90 हजारांपेक्षा जास्तीची रोकड व आर्धा किलो चांदीसह एटीम कार्ड चोरी केल्याची घटना घडली.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे शोध पथक दाखल झाले होते.
