
बातमी कट्टा:- मागील लोकसभा निवडणुकीच्या काळात शिरपूर तालुक्यातील दहिवद या गावात केवळ ३९ टक्के म्हणजे सर्वात कमी मतदान झाले होते त्या पार्श्वभूमीवर आज दहिवद गावात शरद मंडलीक मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शिरपुर अणि महेंद्र माळी तहसीलदार शिरपुर यांच्या मार्गदर्शनानुसार स्वीप अंतर्गत मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले.
याप्रसंगी नोडल अधिकारी नीता सोनवणे महिला व बालविकास पर्यवेक्षिका सोबत पथकात मनोहर धनगर चौधरी अरुण हिरालाल थोरात केंद्रप्रमुख हिलाल पाटील विजय पावरा माध्यमिक विद्यालय दहिवद येथील मुख्याध्यापक एल बी पाटील सर्व शिक्षक व विद्यार्थी, जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक ,गावातील सर्व अंगणवाडी कार्यकर्त्या उपस्थित होते.