बातमी कट्टा:- गुलबर्गा,कर्नाटक येथील ३८ वर्षीय श्रीकांत पल्ला यांच्यावर धुळयातील जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या एसीपीएम मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार करण्यात आले. एसीपीएम डेंटल कॉलेजचे डॉ.शरण बसप्पा यांनी सदर रूग्णाचे ऑपरेशन करत त्याला जीवदान दिले.

याबाबत अधिक माहिती अशी की गुलबर्गा येथील श्रीकांत पल्ला यांना म्युकरमायकोसिस आजाराने गाठले. काळया बुरशीमुळे त्यांच्या सायनसजवळ तसेच दातांच्या काही भागावर इन्फेक्शन झाले होते. धुळयात जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या एसीपीएम मेडिकल कॉलेजच्या म्युकरमायकोसिस विभागात यशस्वी उपचार होत असल्याची माहिती त्यांना सोशल मिडीयाव्दारे मिळाली. त्यानंतर श्रीकांत पल्ला आपल्या नातेवाईकांसोबत धुळयातील एसीपीएम मेडिकल कॉलेजमध्ये दाखल झाले.प्राथमिक तपासणी झाल्यानंतर डेंटल कॉलेजच्या ओरल मॅक्सिलोफे- शियल सर्जरी विभागातील डॉ.शरण बसप्पा यांनी त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करत बुरशीजन्य भाग काढून टाकला.सध्या त्यांची तब्येत ठीक असून ते आता आयसीयूत विश्रांती घेत आहेत.

ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी डॉ.भावेश, डॉ.विनायक, डॉ.प्राची यांनी सहकार्य केले. डेंटलचे प्राचार्य डॉ.अरूण दोडामणी यांच्या मार्गदर्शनाखाली हे ऑपरेशन करण्यात आले. या ऑपरेशसाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ.भाईदास पाटील, उपाध्यक्ष तथा आमदार कुणाल पाटील, सहसचिव संगीता पाटील, डॉ.ममता पाटील, अधिष्ठाता डॉ.विजय पाटील, वैद्यकीय अधिक्षक डॉ.मधुकर पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.