कशी नशिबाने थट्टा मांडली…
21 व्या वर्षी त्याच्या दोघं किडनी निकामी,मदतीसाठी गावकरी आले धावून…

बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यातील बोरगांव येथील 21वर्षीय तरुणाच्या दोघं कीडन्या निकामी झाल्या आहेत. ज्या वयात युवक तारुण्यांच्या धुंदीत विविध स्वप्न पाहत आपल्या वेगळ्याच विश्वात रमत असतो त्या वयात सागर च्या नशिबी दोघं किडनी निकामी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सध्या त्याला इंदिरा हॉस्पिटल शिरपूर येथे डायलिसीस चालु आहे.

वडील आधीच व्याधीने ग्रस्त, आपल्या जवळील असलेल्या 2-3 शेळ्या चारून कसाबसा उदरनिर्वाह करता. आई मजुरी करते, घरात आजी मागील 10 वर्षापासून अंथरुणात आहे तर स्वतः सागर हा सुरत येथे आपल्या काकाजवळ दुसऱ्याच्या सलून दुकानात काम करीत होता.

घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून, कुटुंब प्रतिकूल परिस्थितीत आपल्या जीवनाचा गाडा हाकत असतांना त्यांच्या मुलाच्या नशिबी असे गंभीर आजारपण आल्याने आई-वडील आर्थिक विवंचेत सापडले. ग्रामस्थांना वारुडे कुटूंबाची आर्थिक परिस्थितीची जाण असल्याने आपापल्या परिस्थितीनुसार गावकऱ्यांनी रोख स्वरूपात मदत द्यायला सुरुवात केली. जे ग्रामस्थ कामानिमित्त बाहेरगावी स्थायिक झाले आहेत ते फोनपे द्वारे मदत करीत आहेत. कल्याण स्थित श्री संजय धोंडू बोरगांवकर यांनी दहा हजार रुपये फोनपेद्वारे पाठविले. गावातील माजी सैनिक दगेसिंग राजपूत, सरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया यांनी अनुक्रमे 5100रु व 2200रु रोख स्वरुपात मदत केली.

शिरपूर ला गोयल ट्रेडिंग या दुकानात कामाला जाणारा गावातील तरुण विठोबा जयसिंग राजपूत या युवकाने आपल्या मालकांकडून रु 5100 ची रोख मदत मिळवून दिली.

साधारपणे मुलाच्या या वयात आई-वडील त्याच्या साठी वेगळे स्वप्न पाहत असता तसेच त्याच्या कडून त्यांच्या वेगळ्या अपेक्षा असता, या तरुणाने त्या पूर्ण केल्या ही असत्या पण दुर्दैवाने त्याच्या नशिबी दोघं किडनी निकामी असल्याचे दुखणं आले. पण असे असतांनाही हा तरुण आपल्या दुखण्याला निर्भयपणे सामोरे जात आहे.

विविध समाज माध्यमातून बोरगांवकर ग्रामस्थांनी नम्र आवाहन केले आहे की सागर ज्ञानेश्वर वारुडे या तरुणांस सढळ हाताने मदत करावी व एका गरीब तरुणांस नवसंजीवनी देण्यास यथाशक्ती हातभार लावावा.

त्याला मदतीसाठी फोनपे नं 9558802551 किरण ज्ञानेश्वर वारुडे

WhatsApp
Follow by Email
error: