कापड उद्योग क्षेत्रातील मॅनेजरला कामगारांकडून प्रसाद? शिरपूर तालुक्यातील दहिवद परिसरात खमंग चर्चा

बातमी कट्टा:-शिरपूर तालुक्यातील कामगार कष्टकरी यांना विविध कारण दाखवून त्यांची आर्थिक लुट करणारा एच आर मॅनेजरला कामगारांकडून प्रसाद दिल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. या घटनेची कायदेशीर कुठेही नोंद नसली तरी परिसरात याप्रकरणाची जाेरदार चर्चा सुरु आहे.


सरकारी विभागात लाच घेण्याचे प्रमाण वाढले तसे आता खाजगी क्षेत्रात देखील कामगार कष्टकरी यांच्याकडून वार्षिक वेतनवाढ, पी.एफ ची रक्कम काढून देणे, पदोन्नतीसाठी,रजा मंजूर करणे, इ एस आय चा लाभ मिळवून देण्यासाठी कामगारांकडून लाच घेण्याचे, ओली पार्टी मागण्याचे प्रकार परिसरात सर्रास चालू आहेत. तर काही ठिकाणी एच आर विभागाकडून कामगारांचा अज्ञानाचा फायदा घेऊन पैसे उकळले जात आहेत. खाजगी क्षेत्रात कर्मिक विभाग (HR) तर संबंधित विभाग प्रमुख यांना पार्टी दिल्या शिवाय गत्यंतर नाही अशी भावना सर्वसामान्य कामगार व्यक्त करीत आहेत. कमी पगार, किमान वेतन धोरण कायद्याची अंमलबजावणीचा अभाव तर पाकीट घेऊन मुग गिळुन बसलेले शासकीय कामगार अधिकारी मुळे कामगारांमध्ये नाराजीचा सुर आहे.
असाच एक खमंग किश्याची चर्चा दहिवद परिसरात ऐकायला येत आहे…
आठ दिवसांपूर्वी दहिवद गावाजवळील प्रसिद्ध हॅाटेल वर एका खासगी कंपनीचा जी.एम, एच आर मॅनेजर, इलेक्ट्रीकल इंजिनिअर यांनी दाेन कामगारांकडून पगार वाढ केल्याबद्दल दारु मटणाची पार्टी चालली होती. तर दुसर्‍या बाजुला मॅनेजरच्या जाचाला कंटाळून नाेकरी साेडलेल्या बेरोजगार युवकांची देखील पार्टी रंगली होती. दोन्ही बाजूला दारुची झिंग चढल्याने खुन्नसीला आयतेच आमंत्रण मिळाले. दाेन्ही युवकांना त्यांचा नोकरीचा कसा गेम केला? या विषयावर डिवचले गेले मग काय…
“मुद्यांचा विषय घुध्यावर आला” आणि वेलकम (नाव बदलले आहे) ला सुशिक्षित बेरोजगारांनी चांगलीच अद्दल घडवली. तर परप्रांतीय अधिकारी याला पडता भुई थोडी झाली. अक्षरशः पळ काढावा लागला. वेलकम ने तुमची प्रति दिवस ५० रूपये झालेली पगार वाढ आम्हाला कमिशन/पार्टी न दिल्याने कशी २५ रुपयांवर आणली याची कहाणी त्यांना ऐकवली मग विचारता सोय नाही.एका बदनाम एच आर मॅनेजर मुळे प्रतिष्ठीत उद्योगपती यांच्या प्रतिमेला तालुक्यात धक्का बसत आहे याचीच चर्चा रंगली आहे. तर वेलकम नावाचा हा स्थानिक मॅनेजर मुळे अनेकांचे नुकसान होत असल्याचे प्रत्येक गावातील पाच ते दहा युवकांनी आगामी निवडणुकीत जागा दाखविण्याचे ठरविले असल्याची चर्चा कानी येत आहे.

WhatsApp
Follow by Email
error: