किरकोळ कारणावरून “खून”..

बातमी कट्टा:- पुतणीकडून विकत घेतलेल्या काकडीचे पैसे दिले नाही म्हणून झालेल्या वादातून तीन संशयितांनी एकाचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली असून यातील एका संशयिताला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. तर दोन संशयित फरार झाले आहेत.

शिंदखेडा तालुक्यातील वर्षी येथे मंगळवारी ३ जुलै रोजी सायंकाळी ६ ते सव्वा सहाच्या सुमारास गावातील खालच्या वस्तीत युवराज कोळी यांची पुतणी कु.लिना हिच्या कडून खालच्या गल्लीत राहणाऱ्या प्रकाश भिमराव पांचाळ (सोनवणे), विशाल साहेबराव पांचाळ, मुकेश शाम पांचाळ यांनी काकडी घेतली होती मात्र त्याचे पैसे दिले नाहीत. त्यामुळे युवराज कोळी आणि चुलत भाऊ संजय निंबा कोळी हे दोघे जण त्याबद्दल जाब विचारण्यासाठी खालच्या वस्तीत प्रकाश पांचाळ याच्या घरासमोर आले व काकडीचे पैसे का दिले नाही म्हणून प्रकाश पंचाळला जाब विचारला. त्याचा राग येवून प्रकाश भीमराव पांचाळ, विशाल साहेबराव पांचाळ व मुकेश शाम पांचाळ या तिघांनी शिवीगाळ करीत धक्काबुक्की सुरु केली.यावेळी संजय निंबा कोळी समजवण्याचा प्रयत्न करीत असतांना प्रकाश पांचाळ हा हातात लोखंडी पास घेवून अंगावर धावून आला.मुकेशने संजय कोळीचे दोन्ही हात धरून उचलून जमिनीवर पटकले.तसेच विशाल पांचाळ याने संजय कोळी यांच्या छातीवर बसून त्यांचे डोके दोन्ही हाताने धरुन जमिनीवर आपटून आपटून संजय कोळी यांना जिवे ठार मारले.रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या संजय कोळी यांना सोडून तिघे संशयित घटनास्थळावरून पळाले.असे पोलीस स्टेशनात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी नरडाणा पोलिस ठाण्यात युवराज लक्ष्मण कोळी रा.कोळी गल्ली, वर्षी ता.शिंदखेडा यांनी नरडाणा पोलिसात फिर्याद दिली असून तिघांविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर नरडाणा पोलीसांनी प्रकाश पांचाळ या संशयिताला ताब्यात घेतले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: