बातमी कट्टा:- नंदुरबार जिल्ह्यातील नवापुर तालुक्यातील कोंडाईबारी घाटाच्याखाली खांबचौदर गावाच्या शिवारात पहाटे चार वाजेच्या दरम्यान अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत आयशर चालकाचा जगीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
औरंगाबाद येथून एम.एच.20 ई.एल.9067 क्रमांकाची आयशर अद्रक भरून गुजरात राज्यातील सुरत येथे जातांना कोंडाईबारी घाट येथुन भरधाव वेगात येत असतांना खांबचौदर गावाच्या शिवारात झोपेच्या गुंगीत समोर जात असलेल्या अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिली या धडकेत आयसरची पुर्ण कँबीन चक्काचूर होवून चालक शेख रियाकत शेख हबीब रा.खुलताबाद जि.ओरंगाबाद हा अडकून जागीच ठार झाला तर सहचालक जबर जखमी झाल्याची घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पो.उप.नि.अमृत पाटील, हे.कॉ.संजय माळी ,साहेबराव खांडेकर, योगेश सोनवणे, चालक राजु कोकणी यांनी घटनास्थळी धाव घेऊन क्रेनच्या सहाय्याने मयत चालक आणी जखमी सहचालकाला बाहेर काढले.