कोणी घर देता का घर ? शिरपूर नगरपरिषदे बाहेर त्या 26 कुटूंबीयांचे आंदोलन…

बातमी कट्टा:- अतिक्रमानात बेघर झालेल्या 26 कुटूंबीयांनी शिरपूर नगरपरिषदे बाहेर आज दि 18 रोजी आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे.2017 साली 26 कुटूंबीयांचे अतिक्रमण काढण्यात आले होते. त्यानंतर वेळोवेळी आश्वासन देऊन देखील पुनर्वसनसाठी दुर्लक्ष करण्यात आल्याने पुन्हा त्या 26 कुटुंबीयांनी नगरपरिषदेच्या गेटबाहेर आंदोलन सुरु केले आहे.

आंदोलकांंच्या म्हणण्यानुसार शिरपूर शहरातील आदर्श नगरपरिषदेच्या उपजिल्हा रुग्णालय मागच्या बाजूस 25 ते 30 वर्षांपेक्षा जास्त काळापासून रहिवास असलेले घर 2017 साली शिरपूर नगरपरिषदेच्या 26 कुटूंबीयाच्या घरांवर अतिक्रमणाचा हातोडा मारण्यात आला होता. त्यानंतर त्या 26 कुटूंबींयानी आले संपूर्ण बिर्हाड घेऊन शिरपूर नगरपरिषदे बाहेर धरणे आंदोलन केले होते.

तहसीलदार, प्रांताधिकारी,जिल्हाधिकारी यांच्याकडे वेळोवेळी अर्ज व तक्रार देवुन घरांचे पुनर्वसन झाले नाही. 2017 पासून गेल्या पाच वर्षात या 26 कुटूंबीयांना नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी व राजकीय पुढारी यांचे तोंडी व लेखी आश्वासन देण्यात आले आहेत. मान्यता जागा नियुक्त झाल्यास पुर्नवसन करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.शिरपूर शहरातील रिक्रेशन गार्डनच्या शेजारी बेघरांसाठी जागा मंजूर असतांना व घर बांधण्यासाठी परवानगी मंजूर करण्यात आली आहे.

सदर जागेचे भुमिपूजन देखील करण्यात आले आहे.त्या जागेत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 26 कुटूंबीयांना योजनेत समावेश होऊ शहतो मात्र प्रत्येकी 9 लाख 50 हजार खर्च लागेल असे सांगण्यात आल्याने त्या 26 बेघर कुटूंबीयांनी ते मान्य नसल्याचे सांगत आज दि 18 रोजी शिरपूर वरवाडे नगरपरिषदे बाहेर आंदोलन सुरु केले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: