‘कोविड-19’ मुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना अर्थ सहाय्य देणार जिल्हाधिकारींची माहिती….

बातमी कट्टा: ‘कोविड-19’ रोगामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एस.डी.आर.एफ ) मधून 50 हजार रुपयांचे अर्थ सहाय्य देण्यात येणार आहे, अशी माहिती नंदुरबार जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा मनीषा खत्री यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये दिली आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष हे सक्षम प्राधिकारी असतील. अर्थसाहाय्य मिळण्याबाबत अर्ज करण्यासाठी राज्य शासनाच्या कडून नव्याने मार्गदर्शक कार्यप्रणाली तयार करण्यात येत असून ती लवकरच कार्यान्वित होईल. या प्रक्रियेत पात्र अर्जदारांनी अर्ज करावयाचे असून ही प्रक्रिया सुरू झाल्यावर त्याची माहिती देण्यात येईल.

WhatsApp
Follow by Email
error: