बातमी कट्टा:- खरेदी विक्री संघावर राजकीय आकसापोटी बिनबुडाचे आरोप करण्यात येत आहेत.याबाबत योग्य चौकशी करावी व यात आरोप खोटे निघाल्यास अब्रु नुकसानीचा दावा दाखल करण्यात येणार असल्याचा ईशारा देण्यात आला आहे. सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटी लि.धुळे.च्या पत्रावर निवेदनाद्वारे उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांच्याकडे चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले की , महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांकडून ज्वारी खरेदीसाठी काही महिन्यांपूर्वी नोंदणी प्रक्रिया केली होती.त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारींच्या आदेशानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी, त्यांचे सहकारी आणि धुळे तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन ,संचालन,व्यवस्थापक यांनी संयुक्त बैठक घेऊन ज्वारी खरेदीसाठी नोंदणी करण्याचे अधिकारी यांना देण्यात आले होते.त्यानुसार त्यांनी शेतकऱ्यांना 7/12 उतारे आणून नोंदणी करण्याचे आवाहन केले होते त्यानुसार धुळे तालुक्यातील एकुण 2563 शेतकऱ्यांनी ७/१२ उतारे जिल्हा मार्केटिंग ऑफिस मध्ये जमा केले होते.आलेल्या क्रमाने त्या उतार्यांनी नोंद रजिस्टर मध्ये आणि नंतर अँपमध्ये करण्यात आली.
शासनाने आता ज्वारी खरेदीसाठी लक्षांक वाढवून दिला आहे मात्र खरेदीसाठी 31 जुलै 2021 ही अखेरची तारीख दिल्याने दि 1 ऑगस्ट पासून खरेदी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे 13152.5 क्विंटल इष्टांक शिल्लक असतांना शासनाने 31 जुलैपर्यंत मुदत दिल्याने खरेदी बंद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना ज्वारी विक्रीसाठी आणण्याचे मेसेज जिल्हा मार्केटिंग ऑफिस मधून पाठवले जातात. त्याप्रमाणे शेतकरी ज्वारी विक्रीसाठी आणतात.
एकुण ज्वारी खरेदी तपशील :-
दि 5/4/2021 ते 30/4/2021 या कालावधीत नोंदणी झालेले एकुण शेतकरी 2563 ज्वारी खरेदीसाठी जकुण इष्टांक 24202 क्विंटल,31 जुलै अखेर झालेली खरेदी 11049.50 क्विंटल, शिल्लक ज्वारी इष्टांक 12152.50 क्विंटल ज्वारीमोजणी झालेले शेतकरी 385 ज्वारी मोजणी न झालेले शेतकरी : 2178
धुळे तालुका खरेदी विक्री संस्था ती ज्वारी मोजून शासनाच्या ताब्यात देण्याचे काम करते खरेदी केंद्रावर जिल्हा मार्केटिंग ऑफीस आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे प्रतिनिधी उपस्थित असतात.ज्वारी विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना जिल्हा मार्केटिंग ऑफिसमधून अनुक्रमांक नंतर दिले असल्याने त्या क्रमाने ज्वारी मोजणी करणे ही धुळे तालुका खरेदी खरेदी विक्री संस्थेची जबाबदारी आहे. त्यात संस्था कोणत्याही प्रकारच्या हस्तक्षेप करु शकत नाही.
धुळे तालुक्यातील भाजप आणि इतर काही पक्षाचे पदाधिकारी ज्यात बहुसंख्य ज्वारीचा व्यापार करणारे आहेत ते या संस्थेवर बिनबुडाचे आरोप करुन संस्थेची आणि संचालक मंडळाची बदनामी करत आहेत. संशस्थेवर आरोप करणे हे हास्यास्पद आहे, ही संस्था काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असल्याने विरोधी पक्षाच्या लोकांनी फक्त द्वेषापोटी संस्थेवर बिनबुडाचे आरोप केले असल्याचे देखील निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात म्हटल्यानुसार या प्रकरणी चौकशी करून आरोप करणाऱ्या लोकांना वस्तुस्थिती सांगावी आणि त्यांनी केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य निघाले नाही तर त्यांना समज द्यावी अन्यथा संस्थेची बदनामी करणारे व्यक्तींच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात येईल असा ईशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर संस्थेचे पदाधिकारी यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.