खाजगी ट्रॅव्हल्स जळून खाक ! 11 जणांचा होरपळून मृत्यू !

बातमी कट्टा:- पहाटेच्या सुमारास भरधाव टँकर,टेम्पो आणि खाजगी ट्रॅव्हल्सचा अपघातानंतर अचानक आग लागल्याने संपूर्ण ट्रॅव्हल्स जळून खाक झाली या आगीत सुमारे 11 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची माहिती उघड झाली असून मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्तकरण्यात येत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार आज दि 8 रोजी पहाटेच्या सुमारास दुर्दैवी घटना घडली आहे. यवतमाळकडून मुंबईकडे निघालेल्या चिंतामणी खाजगी ट्रॅव्हल्सला नाशिक येथील नाशिक संभाजीनगर मार्गावर नांदूरनाका जवळील कैलास नगर परिसरात धुळेकडून मुंबईकडे जाणाऱ्या टँकर आणि टेम्पोची धडक बसल्याने तिहेरी भिषण अपघात झाला.या अपघातानंतर ट्रॅव्हल्सला आग लागली या आगीत संपूर्ण ट्रॅव्हल्स जळून खाक झाली.यात 11 प्रवासींचा होरपळून मृत्यू झाला.या ट्रॅव्हल्स मध्ये 30 प्रवासी असल्याचे सांगण्यात आले आहे. घटनास्थळी अग्निशमन बंबसह पोलीस प्रशासन व नागरिकांनी धाव घेत मदत कार्य सूरु केले यात काही जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी मृत व्यक्तींना 5 लाखांची मदत जाहीर केले तर जखमींवर शासकीय मोफत उपचार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.या अपघातानंतर तिन ही वाहनातील चालक फरार झाले आहेत.

WhatsApp
Follow by Email
error: