
बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यातील करवंद गावात एकाचा खून झाल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे. घटनेनंतर करवंद येथून शिरपूर शहर पोलिस स्टेशनवर मोर्चा धडकला.यावेळी संतप्त मोर्चेकरी आक्रमक झाल्याने पोलिस स्टेशनच्या दिशेने दगडफेक झाल्याने पोलिसांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडत गर्दी पांगवली.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील करवंद येथे हळदीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमात दोन लहान मुलांमध्ये किरकोळ वाद झाला.या किरकोळ वादाचे रुपांतर हाणमारीत झाल्याने यात एकाचा खून झाला.खूनाच्या घटनेनंतर सकाळी करवंद येथून शिरपूर शहर पोलिस स्टेशनवर मोर्चा धडकला.
पोलिसांकडून मोर्चेकरांना समजवण्याचा प्रयत्न सुरु असतांना मोर्चा आक्रमक झाल्याने शिरपूर शहर पोलिस स्टेशनवर दगडफेक झाली.यात तीन ते चार महिला पोलिस जखमी झाले.यावेळी दगडफेक होत असल्याने गर्दी पांगवण्यासाठी पोलिसाकंडून अश्रू धुराच्या नळकांड्या फोडण्यात आले.परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये अस आवाहन शिरपूर शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे.