बातमी कट्टा:- श्रीगणेशाच्या विसर्जनासाठी गेलेल्या 45 वर्षीय इसम तापी नदीत बुडाल्याची धक्कादायक घटना काल दि 16 रोजी घडली आहे.बुडत असल्याचे बघुन ग्रामस्थांनी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र तो व्यक्ती खोल पाण्यात गेल्याने बुडाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.याबाबत तेथील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार लक्ष्मण बागले वय 45 रा. बाम्हणे ता. शिंदखेडा येथे हे दि.16 रोजी सातव्या दिवशी गणपती विसर्जन करण्यासाठी जुने कोळदे शिवारातील तापी नदी पात्रात गेले होते.गपणती बुडविण्यासाठी काही भाविक नदी पात्रातत आले होते.श्री गणेशा विसर्जन करण्यासाठी लक्ष्मण बागले हे नदी पात्रात उतरले होते.तापी पात्रात पाण्याचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात बुडाले.ते खोल पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच जुने कोळदे येथील नागरिकांनी तात्काळ नदी पात्रात त्यांना वाचविण्याचे प्रयत्न केला.मात्र ते खोल पाण्यात बुडून गेले.याबाबतचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.रात्री उशिरापर्यंत स्थानिक नागरिकांच्या वतीने शोधकार्य सुरू होते.मात्र लक्ष्म बागले मिळुन आलेले नाहीत.