बातमी कट्टा:- गहाळ झालेले 20 मोबाईल मोठ्या शिताफीने पोलीसांनी मिळवून त्यांच्या मुळमालकाला परत केले आहेत.पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत समाधान व्यक्त केले.

धुळे शहरातील देवपूर पोलीस स्टेशन अंतर्गत मोबाईल हरवल्याचे दाखल असलेल्या गुन्ह्यातील शिताफीने कारवाई करत 20 मोबाईल मुळमालकांना देण्यात आले आहेत. पोलीस उपअधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या हस्ते आज दि 3 रोजी मोबाईल देण्यात आले.देवपूर पोलीस स्टेशनचे सा पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या मोबाईलांसाठी कारवाई करण्यात आली होती.त्यांच्या या कामगिरीने नागरिकांनी देवपूर पोलिसांचे आभार मानत समाधान व्यक्त केले.
