बातमी कट्टा:- गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्या ताब्यातील एक पिस्तुल व जिवंत काडतुसे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार दि 4 रोजी धुळे शहरातील विटाभट्टी भागात संशयित राहुल वाल्मीक सुर्यवंशी हा त्याच्या जवळ 25 हजार किंमतीचे सिल्व्हर रंगाचे गावठी पिस्तूल सह एक जिवंत काडतुस बाळगत असतांना देवपूर पोलीस स्टेशनचे सा.पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूर पोलिसांनी संशयित राहुल सुर्यवंशी याला ताब्यात घेतले आहे.
