गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्ती शिक्षक पुरस्कार सन्मान सोहळा संपन्न

बातमी कट्टा :- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद शाखा शिरपूच्या वतीने दरवर्षी शिरपूर तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात अमूल्य योगदान असणाऱ्या मान्यवरांचा गुणवंत पुरस्कार देऊन सन्मान केला जात असतो.

यावर्षी देखील यात गुणवंत शिक्षण विस्तार अधिकारी, गुणवंत पदोन्नती मुख्याध्यापक, गुणवंत शिक्षक, शिक्षिका, शाळा यांचा सन्मान,तसेच 10वी व 12 वी परीक्षेत ज्यांनी घवघवीत यश संपादन केले अशा शिक्षक पाल्यांचा सन्मान व गेल्या शैक्षणिक वर्षात सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक बंधू-भगिनींचा सन्मान समारंभ शिरपूर येथील एस पी डी एम महाविद्यालयातील कर्मवीर दालन येथे संपन्न झाला.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. भाऊसो तुषार रंधे तर प्रमुख पाहुणे वसंत पावरा माजी समाज कल्याण सभापती धुळे, निशांत रंधे,सचिव किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर श्री विजय बागुल उपसभापती पंचायत समिती शिरपूर, बाळासाहेब पाटील सरपंच जुने भामपूर, एफ.के गायकवाड , आर के गायकवाड, ई.बी. आव्हाड, डॉ नीता सोनवणे आदी शिक्षण विस्ताराधिकारी पंचायत समिती शिरपूर,डी पी बुवा, बी एस बुवा,बाळासाहेब भगवंत बोरसे , सी एस पाटील, रुपेश जैन तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी, सर्व केंद्रप्रमुख , शिक्षक बंधू भगिनी आदी होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले यात डॉ. नीता सोनवणे (गुणवंत शिक्षण विस्तार अधिकारी)
वासुदेव चाचरे (गुणवंत पदोन्नती मुख्याध्यापक)
सविता गिरासे (गुणवंत शिक्षिका)
महुबाई पावरा (गुणवंत शिक्षिका)
योगेश पाटील (गुणवंत शिक्षक)
अनिल पावरा (गुणवंत शिक्षक)
तसेच जिल्हा परिषद शाळा जुने भामपुर व जिल्हा परिषद शाळा चिंचपाणी यांना गुणवंत शाळा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.


डॉ तुषार रंधे बोलतांना म्हणालेत की,सदर उपक्रम आपणा सर्वांना प्रेरणा देणारा असून यामुळे काम करण्याची नवी उमेद मिळत असते. व पुरस्कार प्राप्त शिक्षकांची खूप मोठी जबाबदारी यामुळे वाढत असते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या अंगी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी अधिक प्रयत्नशील असले पाहिजे व त्याबाबत स्वतंत्र पुरस्कार देखील पुढील वर्षापासून द्यावा अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त केली. यावेळी दहावी व बारावी परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या शिक्षक पाल्यांचा सन्मान मागील शैक्षणिक वर्षात सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक बंधू भगिनींचा सन्मान तसेच माझी शाळा, सुंदर शाळा अभियान अंतर्गत तालुकास्तरीय प्रथम क्रमांक मिळविलेल्या जि प शाळा मांजरोद शाळेचा देखील गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी विविध जिल्हा व तालुका संघटनांचे पदाधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक बंधू भगिनी, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर डोळे, प्रास्ताविक छोटू राजपूत व आभार प्रदर्शन संदीप पवार यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी नगराम जाधव, सुनील पाटील, अभय पाटील, धनराज भोई, किशोर निकवाडे, विजय पवार, उज्वला साळुंखे,नि.का.पवार, सुनील सोनवणे, कृष्णा फड , ताराचंद पावरा, जितेंद्र जोशी, लक्ष्मण पाटील, उमेश चव्हाण , लुकेश गावित आदींनी परिश्रम घेतले.

WhatsApp
Follow by Email
error: