बातमी कट्टा:- गुरांची वाहतूक होतांना शिरपूर शहर पोलिसांनी शिताफीने कारवाई करत तीन पिकअप वाहनासह शिरपूर शहरातील चार संशयित व गोवंश गुरे एकुण 8 लाख 66 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

दि 4 रोजी शिरपूर शहर पोलिसांना गुरांची वाहतूक होत असल्याची गोपणीय माहिती प्राप्त झाली होती त्या माहितीच्या आधारे शहर पोलीस स्टेशनचे महेंद्र सपकाळ यांच्या सह पथक सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास शहादा शिरपूर रस्त्यावरील वघाडी टी पॉईंट वर सापळा रचून थांबले होते.यावेळी शहाद्याकडून शिरपूररोडने चोपडाकडे जाणाऱ्या एम.एच 48 टी 2590,एम.एच 46 ए.एफ 479,एम.एच 04 जी.सी 4224 असे तीन महिंद्रा कंपनीचे बोलेरो पिकअप पोलिसांनी थांबवून तपासणी केली असता प्रत्येक वाहनात 6 गोवंश गोर्हे आढळून आले.यावेळी इमराखान अयुब खान रा इदगानगर यासह पोलिसांनी चालक जाकीर मजिद तेली वय 45, शाहरुक शरीफ तेली वय 20,बल्लु मजिद तेली वय 25 सर्व राहणार आदर्श नगर शिरपूर यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करत 18 गोवंश गोर्हेंसह 8 लाख 66 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
