गैरप्रकार सुरु असलेल्या कॅफेंवर पोलीसांची कारवाई…

बघा व्हिडीओ

बातमी कट्टा: धुळे शहरातील काही कॅफेंवर महाविद्यालयीन तरुण तरुणींसाठी एकांताची ‘व्यवस्था’ केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या ठिकाणी गैरप्रकारही होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती.त्यानुसार धुळे येथील देवपूर पोलिसांनी आज दुपारी अचानकपणे देवपूर भागातील 7 कॅफेंवर धाडी टाकल्या असून त्यापैकी पाच ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे.या कारवाईत एकूण 35 ते 40 तरुण-तरुणी आढळून आले.

On YouTube

या सर्व तरुण-तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेत पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या पालकांना बोलावून समज देण्यात आली.तसेच कॅफे चालकांवर कारवाई देखील करण्यात येणार आहे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी तसेच देवपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी सदरची कारवाई केली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: