बातमी कट्टा:- घरफोडी करुन पसार झालेल्या संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेच्या धुळे पथकाने ताब्यात घेतले असून त्याच्याकडून सोने चांदीचे दागिन्यांसह चोरीची मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे.घटनेच्या चार दिवसातच घरफोडीचा गुन्हा उघड केल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दि 15 रोजी शिरपूर शहरातील करवंद रोड वरील शकुंतला लॉन्स समोर भरवस्तीतील चंद्रकांत साहेबराव पाटील यांच्या राहत्या घरी दरवाजाचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी घरातील सोनेचांदीच्या दागिन्यांसह 74 हजारांचा मुद्देमाल चोरी केल्याबाबत शिरपूर शहर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हाचा समांतर तपास स्थानीक गुन्हे शाखेकडून पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असतांना गोपणीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाद्वारे चौकशी केली असता. सदर गुन्हा संदीप अर्जुन गुजर, रा. शेंदुर्णी ता. जामनेर, जिल्हा जळगाव याने केल्याची माहिती प्राप्त झाल्याने स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने शेंदुर्णी येथे जाऊन संदीप अर्जुन गुजर, वय 36 वर्ष, स. भेदुर्णी, ता. जामनेर, जिल्हा जळगाव यास ताब्यात घेवुन याबाबत विचारपुस करता त्याने गुन्ह्याची कबुली दिली
त्याच्या ताब्यातून 15 ग्रँम वजनाची सोन्याची चैन,6 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी,5 ग्रॅम वजनाची सोन्याची पांचाली, 5 ग्रॅम सोन्याची वजनाचे कानातले,३ ग्रॅमची सोन्याची अंगठी,4 ग्रॅम सोन्याची मंगलपोत,140 ग्रॅम वजनाचे चांदीचे कडे, 60 ग्रॅम चांदीचे कंबरपट्टा यासह चोरीची मोटरसायकल असा एकुण 1 लाख 21 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड,अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील,कनिष्ठ तज्ञ,सपोनी योगेंद्रसींग राजपुत, पोउनी योगेश राउत, असई धनंजय मोरे,पोठ श्रीकांत पाटील, प्राभाकर बैसाणे, पोना मायुस सोनवणे, मनोज ग्राम्हणे, पोशि/ कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी, चालक कैलास महाजन, राजेश गिते आदींना केली आहे.