घरफोडी करणाऱ्या त्या 7 संशयितांना पोलिसांनी घेतले ताब्यात..,दोन मोटरसायकलींसह मुद्देमाल जप्त…

बातमी कट्टा:- शेतातील गोडावुनात घरफोडी करून वॉल कंपाउंडच्या 6 फुट लांबीचे तारांच्या जाळीचे 21 बंडल चोरी करणाऱ्या 7 संशयितांसह दोन मोटरसायकली व तारांच्या जाळीचे बंडल पोलीसांनी शिताफीने ताब्यात घेतले आहे.

दि 23 ते 24 मेस रोजीच्या दरम्यान धुळे तालुक्यातील मोघण येथील ग्रामपंचायत पाण्याचे टाकीजवळ मोघण बोरीडँम रोडलगत निरेश अशोक नानकर यांच्या शेतातील गोडावुन मधील 63 हजार किंमतीचे वॉल कंम्पाउंडच्या 6 फुटाच्या तारेच्या जाळीचे 21 बंडल अज्ञातांनी गोडावुन लोखंडी दरवाजाच्या कडीकोंडा तोडून गोडाऊनच्या आत प्रवेश करून चोरुन नेले.याबाबत मोहाडी पोलीस स्टेशन येथे निलेश नानकर यांनी गुन्हा दाखल केला होता.

मोहाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु,पोसई मिर्झा,आर.एस.दराडे, शाम काळे,अजय दाभाडे,गणेश भामरे,सचिन वाघ,जितेंद्र वाघ आदी पथकाकडून या बाबत चौकशी सुरु आसतांना सदर गुन्ह्यातील संशयित रोशन उर्फ पप्या गणेश पाटील रा.मोघण याला ताब्यात घेतले.संशयित रोशन पाटील याने सोबत असलेले साथीदार संशयित जनार्दन उर्फ नानु प्रमोद पाटील वय 20 रा.मोघण ता.धुळे,राकेश निंबा माळी वय 23 रा.मोघण,तुषार गोरख जाधव वय 23 रा.हेंद्रण,शुभम निंबा माळी रा.मोघण,चंद्रशेखर उर्फ चंद्र्या पंढरीनाथ माळी रा.मोघण,अक्षय पुर्ण नाव माहित नाही रा.बहाळ ता.चाळीसगांव आदींचे नावे सांगितले पोलीसांनी सर्व संशयितांना ताब्यात घेऊन चोरी दरम्यान वापरण्आत आलेल्या दोन मोटरसायकल व 16 तारांचे बंडल अशा एकुण 68 हजारांचा माल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: