बातमी कट्टा:- भरधाव टँकर वेगाने जात असतांना टँकरमधील अचानक गळती लागल्याने परिसरात भीतीचे वातवरण निर्माण झाले होते.रस्त्याच्या बाजुला टँकर उभे करुन उपस्थित नागरिकांसह अग्निशमन व पोलीस विभागाच्या पथकाकडून गॅस गळती रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात आले

मिळालेल्या माहिती नुसार सुरत- नागपूर महामार्गावर गुजरात राज्यातील भरुच येथून चाळीसगाव येथे जी.जे 12 व्ही.टी 3160 क्रमांकाचा एल.एन.जी गॅस टँकर जात असतांना धुळे तालुक्यातील नेर शिवारात या टँकरचा अचानक गॅस गळती सुरु झाली.टँकर चालकाने टँकर रस्त्याया बाजुला उभा केला असता यातून मोठ्या प्रमाणात गॅस गळती होत होती.यावेळी परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.घटनास्थळी उपस्थित नागरिकांसह अग्निशमनचे कर्मचारी दाखल होऊन मदत कार्य सुरु केले यावेळी पोलिसांनी देखील खबरदारी घेत सदर टँकर हॉटेल जवळ उभे केले.याबाबत पोलीसांनी संबंधीत गॅस कंपनीच्या अधिकारींशी संपर्क साधला.यावेळी सदर गॅस हा लिकवीड न्याचरल गॅस असून ज्वालाग्रही गॅस नाही त्यामुळे धोका कमी असल्याचे सांगितले मात्र पोलीसांनी योग्य खबरदारी घेत तंज्ञाच्या मदतीने सदर गॅस दुसऱ्या टँकरमध्ये भरण्यात आला आहे.
