
बातमी कट्टा:- शिरपूर येथील डॉ.विजयराव व्ही.रंधे इंग्लिश मीडियम स्कूल येथे भव्य रांगोळी काढून चित्रकला स्पर्धा घेऊन मतदार जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. भारतीय लोकशाहीच्या राष्ट्रीय उत्सवात सामान्य जनतेने हिरारीने भाग घ्यावा या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली होती.
या प्रसंगी शिरपूर तहसीलदार महेंद्र माळी ,पं स शिक्षण विस्तार अधिकारी डॉ नीता सोनवणे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मतदान करणे भारतीय नागरिकांचे कर्तव्य आहे ह्या विचाराची पायाभरणी विद्यार्थी वयात व्हावी असे शिरपूर तालुका तहसीलदार महेंद्र माळी यांनी केले. या प्रसंगी किसान विद्या प्रसारक संस्थेच्या खजिनदार आशाताई रंधे यांनी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मतदान करणे हे आवश्यक आहे.तसेच आपल्या परिसरातील वृद्ध व दिव्यांग व्यक्तींना मतदाना दिवशी केंद्रापर्यंत मदत करण्याचे विद्यार्थ्यांना सांगितले. शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे हस्तलिखित भेट कार्ड बनवून पालकांना मतदानाचा हक्क बजावण्याचा संदेश दिला.यावेळी स्पर्धेत १८९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.यात प्रथम क्रमांक कृतिका बागले द्वितीय योगिनी ढोले, तृतीय मिताली चौधरी ,उतेजनार्थ नेत्रा राजपूत यांना अनुक्रमये गौरविण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या समन्वयक जी. व्ही.पाटील, प्रमोद पाटिल, मुख्याध्यापिका कामिनी पाटील,समाधान राजपूत, सांस्कृतिक प्रमुख वंदना पांडे, वंदना पाटकरी,पदमा सुर्यवंशी आदी उपस्थित होते.तर सूत्र संचालन शगुफ्ता पिंजारी यांनी केले