बातमी कट्टा:- चोरी करणासाठी पठ्ठा मध्यरात्री चप्पल बुटाच्या शोअरुम वर चढला.हळूहळू तो चक्क तिसऱ्या मजल्यापर्यंत चोरी करण्यासाठी पोहचला मात्र तेवढयात तो तिसऱ्या मजल्यावरून खाली रस्त्यावर पडल्याची घटना घडली यात संशयित गंभीर जखमी झाला असून पोलीसांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर शहरातील मेन रोडवरील ज्वाला बूट हाऊस नावाच्या दुकानात चोरी करण्याचा प्रयत्नात असलेला चोरटा तिसऱ्या माळ्यावरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.सिद्धार्थ वाल्मिक शिरसाठ रा.शिरपूर हमू पवन नगर खरदे हा गुरुवारी मध्यरात्री पाताळेश्वर चौकातील मेन रोडवरील ज्वाला बूट हाऊस मध्ये चोरी बूट व चपला चोरी करण्याच्या प्रयत्न करीत असतांना 3ऱ्या माळ्यावरून घसरल्याने खाली पडल्याने सदर चोरीचा प्रकार उघडकीस आला त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. घटनास्थळा वरून पोना पंकज पाटील,पोकॉ गोविंद कोळी,मुकेश पावरा यांनी सदर संशयितास जखमी अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी वार्ड बॉय गणेश बॅंडवाल याच्या खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.