बातमी कट्टा: भारतीय सैन्य दलातील जवान नीलेश अशोक महाजन यांचा गुवाहटी (आसाम) येथील सैन्य दलाच्या रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. जिल्हा प्रशासन सैन्य दलाच्या संपर्कात आहे. जवान नीलेश महाजन यांचा मृतदेह गुवाहटी- मुंबई -धुळे किंवा गुवाहटी- नवी दिल्ली- औरंगाबाद- धुळे मार्गे पर्याय असून, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

जवान नीलेश यांना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये गोळी लागली होती. तेव्हापासून ते गुवाहटी येथील सैन्य दलाच्या रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला असल्याने सर्व घटनाक्रमनिहाय सैन्य अधिकारीमार्फत चौकशी होत आहे. जिल्हा प्रशासन सैन्य दल प्रशासनाच्या संपर्कात आहे. जवान नीलेश महाजन यांच्या मृतदेहावर सैन्य दलाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार यथोचित अंत्यसंस्कार करण्यात येतील, असेही जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.