जि.प.शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

बातमी कट्टा:- घराच्या वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी गेलेल्या जि.प शिक्षकाने गळफास घेऊन जिवनयात्रा संपवल्याची घटना दि 17 रोजी सकाळी घडली आहे. याबाबत पोलीस स्टेशनात नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार दोंडाईचा शहरातील गबाजी नगरमधील रो हाऊसमध्ये जिल्हा.परिषद.शिक्षक गणेश भागवत फंड वय 36 हे आपल्या कुटुंबासोबत राहतात ते मुळ गंगाखेड ता.जि.परभणी येथील रहिवासी असून शिंदखेडा तालुक्यातील रामी-पथारे येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून गणेश भागवत फंड हे कार्यरत होते.
नेहमीप्रमाणे काल दि 16 रोजी रात्री जेवण झाल्यावर पत्नीशी घरगुती गोष्टींवर चर्चा केल्यानंतर शिक्षक गणेश फंड हे घराच्या वरच्या मजल्यावर झोपायला गेले.सकाळी पत्नी रूपाली फंड‌ यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता,दरवाजा आतुन बंद होता.

त्यामुळे त्यांनी शेजारील लोकांना बोलवून दरवाजा उघडला,यावेळी त्यांना गणेश फंड हे सिलींग फॅनला साडीच्या साहाय्याने गळफास लावलेल्या अवस्थेत लटकतांना दिसून आले.दृश्य बघून पत्नी रूपाली फंड यांनी एकच हंबरडा फोडला.यावेळी जमलेल्या कॉलनीतील लोकांनी पोलीसांना घटनेची माहिती दिली. घटनास्थळी दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पथक दाखल होत मयत गणेश फंड यांना उपजिल्हा रूग्णालय येथे शवविच्छेदन साठी दाखल करण्यात आले आहे.याबाबत दोंडाईचा पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्यात आली आहे.

मयत शिक्षक गणेश फंड हे मागील पंधरा वर्षापासुन धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक सेवा पुरवत होते.ह्या अगोदर त्यांनी वळदे-चवळदे सात ते आठ वर्ष सेवा बजावली.त्यानंतर रामी-पथारे येथे मागील चार वर्षापासुन सेवा देत होते.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे.

WhatsApp
Follow by Email
error: