डंपरची टाटा मॅजिकला धडक, एकाचा मृत्यू प्रवासी जखमी

बातमी कट्टा:- दगडी कोळसा वाहतूक करणाऱ्या भरधाव डंपरने प्रवासी वाहतूक करणाऱ्या चारचाकी टाटा मॅजिक वाहनाला धडक दिल्याची घटना घडली आहे.या भीषण अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला असून तर सात ते आठ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर शहादा रस्त्यावरील अर्थे ते वाघाडी गावादरम्यान आश्रमशाळा समोर आज दि 18 रोजी सकाळच्या सुमारास गुजरात राज्यातून दगडी कोळसा घेऊन जाणाऱ्या जि जे 21 वाय 9300 क्रमांकाच्या डंपरने शहादा कडून शिरपूरच्या दिशेने जातांना खामखेडा येथून शिरपूरच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या टाटा मॅजिक या वाहानाला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली.घटनेची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत रुग्णवाहिका बोलविण्यात आली.या भीषण अपघातात टाटा मॅजिक वाहनातील उमेश राजेंद्र पाटील वय 18 रा खामखेडा या युवकाचा मृत्यू झाला असून प्रमोद नथ्थु शिरसाठ वाहक कविता भगवान वाडीले,गोपाल संतोष पवार,कृष्णा रमेश शिंदे,आकाश बबलु कुराडे,अरुण संतोष वडर,किसन संतोष वडर,संतोष बारकु वडर,भिका महादु धनगर,मनिषाबाई गुजर,आशाबाई गुजर सर्व रा.खामखेडा प्रवासी जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.सर्वांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमींवर उपचार सुरु आहे.तर एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

WhatsApp
Follow by Email
error: