बातमी कट्टा:- आज सकाळीच ढगांमध्ये काळी चादर पाहावयास मिळाली. यामुळे सकाळी काही क्षणासाठी अंधारमय परिस्थिती झाली होती.यामुळे तुफान पाऊस पडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती.सातपुडा पर्वत रांगेत मुसळधार पाऊस झाल्याने अरुणाती नदी दुथडी वाहत असून नदीतील पाणी वेगाने वाहत आहे.तर शिरपूर तालुक्यातील भाटपुरा येथे विज कोसळून गाय व वासरुचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
आज सकाळी ढगांमध्ये काळी चादर पहावयास मिळाली होती.यासोबतच जोर जोराने ढगांचा गडगडाटासह विजेच्या कडकडाटाचा आवाज देखील येत होता.सकाळी शिरपूर तालुक्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडला होता तर सातपुडा पर्वत रांगेत मुसळधार पाऊस पडत असल्याने आज अरुणावती नदीला अचानक पुर परिस्थिती निर्माण झाली होती.वेगाने येणाऱ्या गढूळ पाण्याने अरुणावती नदी दुथडी वाहत होती.वेगाने वाहणाऱ्या अरुणावती नदीचे दृश्य बघण्यासाठी एकच गर्दी झाली होती.
आज सकळी विज कोसळल्याने शिरपूर तालुक्यातील होळ येथील झाडाला बांधलेल्या गाय व वासरुचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.भाटपूरा शिवारातील होळ रस्त्यावर भारती अंकुश सुर्यवंशी यांच्या मालकीच्या शेतात झाडाजवळ गाय व वासरुच्या अंगावर विज कोसळल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.