ताजे मासे स्वस्तात देण्याच्या बाहण्याने बलात्कार प्रकरणी संशयिताला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी…

बातमी कट्टा:- ताजे मासे स्वस्तात देण्याच्या बाहण्याने धरणावर बोलवून 28 वर्षीय विधवा महिलेवर बलात्कार केल्याची घटना तीन महिन्यांपूर्वी घडली होती याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र तीन महिन्यांपासून संशयित फरार होता. अखेर पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले असून सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्या संशयिताला बुधवार पर्यंत पोलीस कोठडी दिल्यानंतर मा.न्यायालयाने 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीची शिक्षा ठोठावली आहे.

शिंदखेडा तालुक्यातील जामफळ धरणातील ताजे मासे स्वस्त दरात देण्याचे आमिष दाखवून शिरपूर येथील २८ वर्षी विधवेवर तीन महिन्यांपूर्वी जामफळ धरण परिसरातील झोपडीत बलात्कार केल्याप्रकरणी शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयित नीलेश छगन भोई वय २७, भोई कॉलनी, शिरपूर हा तीन महिन्यांपासून फरार होता. त्याला रविवारी शिंदखेडा पोलिसांनी अटक करत सोमवारी शिंदखेडा मा.न्यायालयत हजर केले असता बुधवार पर्यंत पोलिस कोठडीची शिक्षा सुनावली होती. पोलिस कोठडी संपल्याने शिंदखेडा न्यायालयात त्याला हजर केले असता,मा.न्यायालयाने त्याची १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.”जामफळ धरणातील ताजे मासे स्वस्त दरात देईल”, असे सांगत शिरपूर येथील २८ वर्षीय विधवा तरुणीवर शिरपूर येथील नीलेश भोई याने जामफळ धरणाजवळील झोपडीत बळजबरीने १ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी दहाच्या सुमारास बलात्कार करत’कुठे सांगितल्यास तुला व तुझ्या मुलास जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत दाखल करण्यात आले होते. संशयित तीन महिन्यांपासून फरार होता.त्याला ९ जानेवारीला शिंदखेडा पोलिस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक प्रशांत गोरावडे यांनी जामफळ धरण परिसरातून अटक केली होती.

WhatsApp
Follow by Email
error: