बातमी कट्टा:- घरातून बेपत्ता झालेल्या युवकाचा तापीनदी पुलावरुन दि 4 रोजी रात्री तापी नदीत उडी घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असल्याने युवकाचा तापी नदीत शोध सुरु होता.आज दि 7 रोजी सकाळी त्या युवकाचा मृतदेह तापी नदीत आढळून आला आहे.
शिरपूर तालुक्यातील वनावल येथील युवक किरण नानाभाऊ शिरसाठ (कोळी) वय 18 याने गिधाडे तापी नदी पुलावरून दि 4 रोजी तापी नदी पात्रात उडी घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.याबाबत दि 4 रात्री तापी नदीपुलावर नागरिकांनी गर्दी केली होती.तेव्हा पासून तापी नदी पात्रात त्याचा शोध सुरु होता. तापी पुलावर चपला व मोटरसायकल मिळुन आल्याने तापीत उडी घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता.
किरण नानाभाऊ शिरसाठ याने तापीत उडी घेतली की नाही याबाबत कुठलाही ठोस माहिती मिळुन आली नव्हती मात्र तो घरातून बेपत्ता झाला व त्याची चप्पल तापी पुलावर मिळुन आल्याने युवकाच्या नातेवाईक व घरच्या मंडळींकडून शोध सुरु होता.आज चौथ्या दिवशी दि 7 रोजी सकाळी त्याचा मृतदेह तापी नदीत आढळून आला आहे.मयत किरण शिरसाठ याने ऐन दिवाळी सणासुदीला तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या का केली असावी याबाबत अनेक तर्क वितरक लावण्यात येत आहे.त्याच्या आत्महत्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.