बातमी कट्टा:- तापी नदीवरील हातनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने आज सायंकाळी सात वाजता धरणाचे 20 दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे तापी नदी पात्रात 34 हजार 785 क्यूसेक पाणी सोडण्यात येत आहे.रात्री संपूर्ण 41 दरवाजे उघडण्यात आला असून पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर तापी नदी काठावर राहणाऱ्या शिंदखेडा व शिरपूर तालुक्यातील नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.

धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाणी प्रवाह आणखी वाढण्याची शक्यता असल्याने हतनूर धरणाच्या खालील गावांमधील नागरिकांनी तापी नदीपात्रात आपली गुरे- ढोरे सोडू नयेत अथवा नदी पात्रात जाऊ नये. तापी नदीत सोडण्यात येणारे पाणी शुक्रवारी (23 जुलै) सकाळी सुलवाडे बॅरेज येथे पोहोचण्याची शक्यता आहे. सद्य:स्थितीत 9200 क्यूसेक्स पाणी सुलवाडे बॅरेजमधून सुरू आहे. त्यामुळे शिंदखेडा, शिरपूर येथील तहसीलदारांसह दोंडाईचा येथील अपर तहसीलदारांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.